मराठी बातम्या /बातम्या /देश /काँग्रेसला सलग दुसऱ्या दिवशी दुसरा मोठा धक्का; अमरिंदर पोहोचले अमित शाहांच्या घरी

काँग्रेसला सलग दुसऱ्या दिवशी दुसरा मोठा धक्का; अमरिंदर पोहोचले अमित शाहांच्या घरी

 पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह (Ex CM of Punjab Amarinder Singh meets Amit Shah in Delhi) यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह (Ex CM of Punjab Amarinder Singh meets Amit Shah in Delhi) यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह (Ex CM of Punjab Amarinder Singh meets Amit Shah in Delhi) यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली.

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह (Ex CM of Punjab Amarinder Singh meets Amit Shah in Delhi) यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. अमरिंदर सिंह काँग्रेसमध्ये (Talks of Amarinder Singh to join BJP) नाराज असून लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना या भेटीमुळे पुन्हा उधाण आलं आहे. मात्र, अमरिंदर सिंह यांचा दिल्ली दौरा (Personal reason) हा वैयक्तिक कारणांसाठी असून ते आपल्या दिल्लीतील निवडक मित्रांना भेटणार असल्याचं त्यांच्या प्रसिद्धी प्रमुखांकडून सांगण्यात आलं आहे.

मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर भाजप प्रवेशाची चर्चा

पंजाबमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्याशी झालेल्या वादानंतर अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं. काँग्रेसनं चरणजीत सिंह चन्नी यांना पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी बसवलं होतं. मुख्यमंत्रीपदानंतर आता अमरिंदर सिंह काँग्रेसला रामराम ठोकतील, अशी अटकळ राजकीय वर्तुळात बांधली जात आहे.

सलग दुसरा धक्का

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसला जोरदार धक्का बसला होता. या घटनेला 24 तास उलटायच्या आतच हा काँग्रेसला बसलेला दुसरा धक्का मानला जात आहे. ज्या नवज्योत सिंग सिद्धू यांच्यामुळे पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून यायला सुरुवात झाली होती आणि अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं, ते नवज्योत सिंग सिद्धूदेखील बंडखोरीच्या पवित्र्यात असल्याचं चित्र पंजाबमध्ये मंगळवारपासून निर्माण झालं होतं.

अमरिंदर यांच्या भूमिकेकडे लक्ष

अमरिंदर सिंह हे मास-बेस असणारे मोठे नेते असून त्यांच्यामागे पंजाबमधील मोठी व्होटबँक आहे. त्यांनी जर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली, तर तो पक्षासाठी मोठा धक्का असणार आहे. तर आतापर्यंत पंजाबमध्ये फारशी कमाल दाखवू न शकलेल्या भाजपसाठी ही मोठी संधी ठरण्याची शक्यता आहे.

First published:
top videos

    Tags: Amit Shah, Delhi, Punjab