News18 Lokmat

1 लाखाचा दंड आणि दिवसभर कोर्टात उभं रहा, CBIच्या माजी संचालकांना शिक्षा

सीबीआयचे माजी संचालक नागेश्वर राव यांना सर्वोच्च न्यायालयानं दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 12, 2019 01:19 PM IST

1 लाखाचा दंड आणि दिवसभर कोर्टात उभं रहा, CBIच्या माजी संचालकांना शिक्षा

दिल्ली, 12 फेब्रुवारी : न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सीबीआयचे माजी संचालक नागेश्वर राव यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याप्रकरणी मुख्य न्यायधीश रंजन गोगोई यांनी नागेश्वर राव यांना खडे बोल सुनावले.

दरम्यान, कोर्टाचा आवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं नागेश्वर राव यांना 1 लाख रूपयांचा दंड आणि आजच्या दिवसाचं कामकाज संपेपर्यंत न्यायालयात उभं राहण्याची शिक्षा ठोठावली आहे. सीबीआयचे संचालक अलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर सरकरानं नागेश्वर राव यांची नागेश्वर राव यांची नियुक्ती केली होती. पण, नागेश्वर राव यांना कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेता येणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं होतं. पण, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर देखील नागेश्वर राव यांनी मुझफ्फरपूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील चौकशी अधिकाऱ्यांची बदली केली होती. त्याच प्रकरणी नागेश्वर राव आता दोषी ठरले आहेत. 1 लाख रूपयांचा दंड भरण्यासाठी नागेश्वर राव यांना आठवड्याची मुदत देण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण

2018 साली मुझफ्फरपूर जिल्ह्यातील वसतीगृहामध्ये राहणाऱ्या मुलींच्या लैंगिक शोषणाचा प्रकार समोर आला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय याप्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करू नयेत असे स्पष्ट आदेश न्यायालयानं दिले होते. त्यानंतर देखील या प्रकरणातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.

राव यांचा कोर्टासमोर माफीनामा

Loading...

सुनावणी दरम्यान नागेश्वर राव यांच्यावतीनं के.के. वेणुगोपाल यांनी न्यायालयामध्ये बाजू मांडली. यावेळी नागेश्वर राव यांनी न्यायालयासमोर माफीनामा देखील सादर केला. पण, न्यायालयानं मात्र त्यांना शिक्षा सुनावली.

सीबीआयमधील वाद आणि नागेश्वर राव

सीबीआयचे संचालक अलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यातील वाद समोर आला. त्यानंतर केंद्र सरकारनं याप्रकरणी हस्तक्षेप करत दोन्ही अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं. शिवाय, काही अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील केल्या.

यावेळी सरकारनं नागेश्वर राव यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती केली. पण, नागेश्वर राव यांना काही अटी या कोर्टाकडून घातल्या गेल्या. मुझफ्फरपूर प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांच्या बदल्या करता येणार नाहीत असं स्पष्ट आदेश न्यायालयानं दिले होते. पण, त्यानंतर देखील नागेश्वर राव यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यामुळे न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं नागेश्वर राव यांनी दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे.


वाचा - VIDEO : मिसेस मुख्यंमत्री जेव्हा बैलगाडीतून मंचावर येतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 12, 2019 01:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...