Home /News /national /

Padma Awards 2022 : बंगालच्या माजी मुख्यमंत्र्यांनी पद्म पुरस्कार नाकारला, घोषणा होताच दिला नकार

Padma Awards 2022 : बंगालच्या माजी मुख्यमंत्र्यांनी पद्म पुरस्कार नाकारला, घोषणा होताच दिला नकार

केंद्र सरकारकडून आज पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. एकूण 128 जणांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.

    नवी दिल्ली, 25 जानेवारी : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच अशा पद्म पुरस्काराची (Padma Awards 2022) घोषणा करण्यात आली आहे. बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य (ex-Bengal CM Buddhadeb Bhattacharjee) यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. पण, याची माहिती कळताच भट्टाचार्य यांनी पुरस्कार नाकारला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे बंगाल आणि मोदी सरकारमधील वादाची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारकडून आज पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. एकूण 128 जणांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनाही पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार,मला जर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला असेल तर तो मी नाकारत आहे, असं स्पष्टपणे सांगितलं आहे. बंगाल विधानसभा निवडणुकीपासून मोदी सरकार आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात संघर्ष शिगेला पोहोचला आहे. ममतादीदींनी निवडणुकीत जरी जिंकली असली तरी वाद अजूनही कायम आहे. आज पद्म पुरस्कारामध्ये पुन्हा एकदा याची झलक पाहण्यास मिळाली. तर दुसरीकडे, काँग्रेस नेता गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांचा पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. आझाद यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी ट्वीट करून सरकारचे आभार मानले आहे. आझाद यांची पुरस्कारासाठी योग्य निवड केंद्र सरकारने केली आहे, असं म्हणत थरूर यांनी आझाद कुटुंबीयांचंही अभिनंदन केलं. तसंच, मधुर जाफरी, राजीव महर्षी, मायक्रोसॉफ्ट के सीईओ सत्य नाडेला (Satya Nadella), गुगल (Google) की पेरेंट कंपनी एल्फाबेट के सीईओ सुन्दर पिचाई (Sundar Pichai) यांनाही पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. तर नीरज चोप्रा (Neeraj Chopra), वंदना कटारिया, अवनी लखेड़ा आणि सोनू निगमसह 107 जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. यावर्षी  एकूण १२८ पद्मपुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये ४ ‘पद्मविभूषण’, १७ ‘पद्मभूषण’ आणि १०७ ‘पद्मश्री’ पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार घोषित झालेल्या मान्यवरांमध्ये ३४ महिलांचा समावेश आहे. १० अप्रवासी भारतीयांना हे मानाचे पुरस्कार जाहीर झाले असून १३ मान्यवरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. पद्म भूषण पुरस्कार 1. गुलाम नबी आझाद 2. बुद्धदेव भट्टाचार्य 3. मधुर जाफरी 4. राजीव महर्षी 5. सत्यनारायण नाडेला 6. सुंदर पिचाई 7. व्हिक्टर बनर्जी 8. गुरमीत बावा (मरणोत्तर) 9. नटराजन चंद्रशेखरन 10. कृष्ण एल्ला आणि सुचित्रा एल्ला 11. देवेंद्र झाझरिया 12. राशिद खान 13. सायरस पूनावाला 14. संजय राजाराम 15. प्रतिभा राय 16. स्वामी सच्चिदानंद 17. वशिष्ठ त्रिपाठी महाराष्ट्रासाठी जाहीर झाले पद्म पुरस्कार पद्मविभूषण कला - प्रभा अत्रे पद्मभूषण उद्योग - नटरंजन चंद्रशेखरन आरोग्य - सायरस पुनवाला पद्मश्री आरोग्य - हिंमतराव बावस्कर आरोग्य - विजयकुमार विनायक डोंगरे कला - सुलोचना चव्हाण कला - सोनू निगम विज्ञान आणि इंजिनियरिंग - अनिलकुमार राजवंशी आरोग्य - भीमसेन सिंघल आरोग्य - बालाजी तांबे (मरणोत्तर)
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या