VIDEO धक्कादायक; निवृत्त लष्करी अधिकारी म्हणाला, 'बलात्काराचा बदला बलात्काराने'

VIDEO धक्कादायक; निवृत्त लष्करी अधिकारी म्हणाला, 'बलात्काराचा बदला बलात्काराने'

लष्करातील मेजर जनरल पदावरून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याने एक धक्कादायक वक्तव्य केले.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर: काश्मीरमधील पंडितांवर खोऱ्यात झालेल्या अत्याचारासंदर्भात अनेक वेळा बोलले जाते. काश्मीर आणि तेथील पंडितांच्या प्रश्नावर वृत्तवाहिन्यांवर देखील चर्चा होत असते. अशाच एका चर्चेदरम्यान लष्करातील मेजर जनरल पदावरून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याने एक धक्कादायक वक्तव्य केले. संबंधित अधिकाऱ्याच्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे. वृत्तावाहिनीवरील चर्चाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काश्मीरी पंडितांवरील अत्याचारासंदर्भआत एका वृत्तवाहिनीवर चर्चा सुरु होती. या चर्चेत सहभागी होण्यासाठी 5 जण सहभागी झाले होते. त्यापैकी एक निवृत्त लष्करी अधिकारी मेजर जनरल एस.पी.सिन्हा देखील होते. त्यांनी या चर्चेदरम्यान खूनाच्या बदल्यात खून आणि बलात्काराच्या बदली बलात्कार असे म्हटले. सिन्हा यांच्या या विधानानंतर निवेदकासह सर्वजण संतप्त झाले. प्रथम महिला अँकरने सिन्हा यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण ते काही केल्या ऐकण्यास तयार झाले नाहीत. त्यावर चर्चे सहभागी झालेले अन्य लोकांनी सिन्हा यांच्या विधानावर आक्षेप घेतला.

सिन्हा यांच्या या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कुमार विश्वास यांनी देखील हा व्हिडिओ ट्विट केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना ते म्हणतात, प्रत्येकाला येथे मोठे होण्याची घाई आहे. त्यातूनच कायदा, घटना यांना बाजूला करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सिन्हा यांच्या या विधानावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. सामान्य नागरिक नव्हे तर लष्करातून निवृत्त झालेल्या अनेक अधिकाऱ्यांनी देखील सिन्हा यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हटले आहे. लेफ्टनंट जनरल निवृत्त सैयद अता सहनैन, माजी महासंचालक लेफ्टनंट जनरल विनोद भाटिया यांनी देखील हे विधान दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. सिन्हा यांच्या या वक्तव्यामुळे भारतीय लष्कराची प्रतिमा खराब झाल्याची प्रतिक्रिया लेफ्टनंट कर्नल संदीप परीजा यांनी दिली. परीजा यांनी सिन्हा यांचे मेजर जनरल ही रँक परत घेण्याची मागणी केली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: November 18, 2019, 10:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading