'त्या वाटेवर एक मिनिट जास्त घालवलं असतं तर मरणाशी गाठ होती'

'त्या वाटेवर एक मिनिट जास्त घालवलं असतं तर मरणाशी गाठ होती'

एव्हरेस्ट शिखर सर करणं हे प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं. पण यावर्षी एव्हरेस्ट शिखरावर झालेल्या ट्रॅफिक जॅममध्ये 11 गिर्यारोहकांचा मृत्यू ओढवला. याच दिवशी दिल्लीचे गिर्यारोहक आदित्य गुप्ता हेही एव्हरेस्टच्या शिखराच्या वाटेवर होते. एव्हरेस्टवरच्या 26 हजार फूट ते 29 हजार फुटांपर्यंतच्या भागात 'डेथ झोन'मध्ये तेही अडकले होते पण त्यातून ते कसे बचावले ते ऐका त्यांच्याकडूनच.

  • Share this:

दिल्ली, 11 जून : एव्हरेस्ट शिखर सर करणं हे प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं. पण यावर्षी एव्हरेस्ट शिखरावर झालेल्या ट्रॅफिक जॅममध्ये 11 गिर्यारोहकांचा मृत्यू ओढवला. यामध्ये महाराष्ट्रातले अंजली कुलकर्णी आणि निहाल भगवान हेही होते.याच दिवशी दिल्लीचे गिर्यारोहक आदित्य गुप्ता हेही एव्हरेस्टच्या शिखराच्या वाटेवर होते. एव्हरेस्टवरच्या 26 हजार फूट ते 29 हजार फुटांपर्यंतच्या भागात 'डेथ झोन'मध्ये तेही अडकले होते पण बचावले.

खाली येताना ट्रॅफिक जॅम

ते सांगतात, 22 मे ला सकाळी साडेसात वाजता मी एव्हरेस्ट शिखर सर केलं. मला वर जाण्यासाठी दोन तास वाट पाहावी लागली. पण खाली येतानाची परिस्थिती फारच भयानक होती.

या ट्रॅफिक जॅममध्ये 50 वर्षांचे आदित्य गुप्ता बचावले पण सगळेच गिर्यारोहक गुप्ता यांच्याइतके सुदैवी नव्हते. शिखराकडे जाणाऱ्या वाटेवर झालेल्या कोंडीत 11 गिर्यारोहकांचा मृत्यू ओढवला.

या वाहतूक कोंडीमध्ये गिर्यारोहकांना जीव गमवावा लागत असेल तर नक्कीच त्यावर काहीतरी उपाय काढला पाहिजे, असं आदित्य गुप्ता यांना वाटतं.

विक्रमी परवाने

नेपाळ सरकारने यावेळी गिर्यारोहकांना विक्रमी परवाने दिले. असे 381 परवाने होते. प्रत्येक गिर्यारोहकासोबत एक शेर्पा गाइड असतो. त्यामुळे एव्हरेस्टवर जाणाऱ्यांची संख्या लगेचच दुप्पट होते.

गिर्यारोहणाचा हा हंगाम एप्रिल महिन्याच्या अखेरीला सुरु होता आणि मे महिन्यापर्यंत संपतो. एव्हरेस्टची मोहीम सर करण्यासाठी सुमारे 45 दिवस लागतात.

हवामान अनुकूल असेल तरच शिखरावर चढाई करता येते. यावर्षी हा काळ खूपच थोडा होता. 21 मे ते 23 मे या काळात एव्हरेस्टचं शिखर गाठता येणार होतं. त्यामुळेच शिखर चढण्यासाठी प्रत्येकाची चढाओढ लागली आणि ही कोंडी झाली, असं आदित्य गुप्ता सांगतात.

महागडी मोहीम

एव्हरेस्टची मोहीम आखणं ही अत्यंत महागडं आहे. गिर्यारोहकांना प्रत्येकी 23 ते 25 लाखांची फी भरावी लागते. हा खर्च परवडणारे जगभरात अनेक गिर्यारोहक आहेत. त्यामुळेच जगातल्या या उंच शिखरावर गर्दी झाली आहे.

आपण साधं रस्त्यावरच्या ट्रॅफिक जॅममध्ये अडकलो तर जीव गुदमरतो. तर 26 हजार फुटांवर अडकल्यावर काय परिस्थिती असेल? आदित्य गुप्तांनी याचा थरारक आणि भीतीदायक अनुभव घेतला आहे.

मेंदूही चालत नाही

ते म्हणतात, शिखराकडे जाणाऱ्या वाटेवर एखादं मिनिट जास्त घालवावं लागलं तरी थंडी आणि कमी ऑक्सिजनच्या वातावरणात जीव गोठून जातो.पुरेशा ऑक्सिजनअभावी मेंदूही चालत नाही. त्यामुळे एखादा निर्णय घेणंही अवघड होऊन बसतं. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अजून वाढते.

यामुळेच एव्हरेस्टवर जायचं असेल तर नुसती शारीरिक क्षमता असून चालत नाही.मानसिकदृष्ट्याही तुम्ही अत्यंत 'फिट' असलं पाहिजे. कितीही निर्धाराने तुम्ही ही मोहीम आखलीत तरी त्या शिखरानेही तुम्हाला तेवढीच साथ देणंही महत्त्वाचं आहे हे आदित्य गुप्ता आवर्जून सांगतात.

=============================================================================================================

VIDEO : मंत्रिमंडळात कोणते पद मिळणार? विखे पाटील म्हणतात...

First published: June 11, 2019, 7:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading