S M L

धक्कादायक VIDEO: मतदान झाल्यानंतर महिला अधिकाऱ्याने EVM थेट घरी नेलं

मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिला निवडणूक अधिकारी ही भाजप उमेवाराच्या घराशेजारीच राहणारी आहे.

Updated On: Dec 7, 2018 05:36 PM IST

धक्कादायक VIDEO: मतदान झाल्यानंतर महिला अधिकाऱ्याने EVM थेट घरी नेलं

जयपूर, 7 डिसेंबर : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे. यादरम्यान एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एका महिला अधिकाऱ्याने मतदानानंतर ईव्हीएम मतदान केंद्रावर न नेता थेट स्वत:च्या घरी नेल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर काँग्रेसकडून ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं आहे. तसंच काँग्रेसनं याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारही नोंदवली आहे. पाली या विधानसभा मतदारसंघात निवडणूक अधिकारी असलेल्या महिलेने ईव्हीएम मशीन मतदान केंद्रावर घेऊन जाणं अपेक्षित होतं.या अधिकाऱ्याने ईव्हीएम थेट स्वत:च्या घरी नेल्याचं व्हिडिओत दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिला निवडणूक अधिकारी ही भाजप उमेवाराच्या घराशेजारीच राहणारी आहे.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता मोठा गोंधळ उडाला आहे. निवडणूक आयोगाने अधिक सतर्कतेने ईव्हीएमची सुरक्षा करावी, अशी मागणी आता काँग्रेसने केली आहे.

दरम्यान, राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीत 5 वाजेपर्यंत 72.14 टक्के इतकं मतदान झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 7, 2018 05:36 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close