मतपत्रिका शक्यच नाही, EVMचाच वापर होणार! - मुख्य निवडणूक आयुक्त

मतपत्रिका शक्यच नाही, EVMचाच वापर होणार! - मुख्य निवडणूक आयुक्त

एखादा पक्ष जिंकला तेव्हा EVM योग्य आणि एखादा पक्ष हरला तर EVM अयोग्य असं कसं असू शकेल?

  • Share this:

नवी दिल्ली 24 जानेवारी : ईलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवरून सुरू असलेला वाद थांबायची काही चिन्ह दिसत नाहीत. लोकसभेच्या निवडणूका जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्ष त्याची सोयीने चर्चा करत असतात. लंडनमधल्या तथाकथीत हॅकरच्या पत्रकार परिषदेनंतर त्या चर्चेने वेगळं वळण घेतलं. आता मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी त्यावर आपली भूमिका स्पष्ट केलीय.

दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात अरोडा म्हणाले, "मतपत्रिकेच्या युगात आता जाणे शक्य नाही. असा निर्णय घेणंही अशक्य आहे. निवडणूक आयोग EVMचाच वापर करणार आहे." ते पुढे म्हणाले गेल्या दोन दशकांपासून आम्ही EVMचा वापर करतोय. त्यात आढळणाऱ्या त्रुटी अगदीच कमी आहेत. जगात कुठलीच अशी पद्धत नाही की ज्यात काही त्रूटी आढळून येत नाही. भारतात जी पद्धत वापरली जाते ती आदर्श पद्धत आहे.

लंडनमध्ये हॅकर सय्यद शुजा याने EVMमशिन्स हॅक होत असल्याचा दावा केला होता. त्यानंतर राजकीय पक्षांनी भाजपवर आरोप करत मशिन्स बदलण्याची मागणी केली होती. तर हा काँग्रेसचा कट असल्याचा आरोप भाजपने केला होता.

अरोडा म्हणाले.

एखादा पक्ष जिंकला तेव्हा EVM योग्य असते.  तर एखादा पक्ष हरला तर EVM योग्य नसते असं कसं असू शकेल? EVM म्हणजे काही फुटबॉल नाही असा टोलाही त्यांनी लागावला. गेल्या दोन दशकांपासून EVMचा वापर करण्यात येत आहे आणि त्यांचे चांगले परिणाम मिळाले आहेत असंही त्यांनी सांगितलं.

Special Report : मंत्रीपद राहणार की जाणार? पंकजा मुंडे म्हणतात...

First published: January 24, 2019, 1:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading