'EVM हॅकिंग' हा काँग्रेसचा राजकीय स्टंट - रविशंकर प्रसाद

'EVM  हॅकिंग' हा काँग्रेसचा राजकीय स्टंट - रविशंकर प्रसाद

'भारत आणि निवडणूक आयोगाला बदनाम करण्यासाठीच काँग्रेसने ही पत्रकार परिषद घडवून आणली.'

  • Share this:

नवी दिल्ली 22 जानेवारी : EVM मशिन्सवर विरोधी पक्ष कायम शंका उपस्थित करत असतात. लोकसभेला चार महिने राहिले असताना पुन्हा एकदा या मुद्याने उसळ घेतली आहे. लंडनमध्ये एका हॅकरने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सोमवारी काही आरोप केले होते. कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी त्याला मंगळवारी उत्तर दिलं. ही पत्रकार परिषद म्हणजे काँग्रेसचा राजकीय स्टंट असल्याती टीका रविशंकर प्रसाद यांनी केली.

प्रसाद म्हणाले, " 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आपला पराभव स्पष्ट दिसत आहे.त्यामुळेच त्यांनी कारणं शोधायला सुरुवात केलीय. लंडनमध्ये झालेली पत्रकार परिषदेत ही काँग्रेसने प्रायोजित केली होती." काँग्रेसचे नेते कपील सिब्बल या पत्रकार परिषदेत काय करत होते असा सवालही त्यांनी केला.

भारत आणि निवडणूक आयोगाला बदनाम करण्यासाठीच काँग्रेसने ही पत्रकार परिषद घडवून आणली असा आरोपही त्यांनी केला. वारंवार EVMवर शंका घेणं म्हणजे 2014 मध्ये लोकांनी जो जनादेश दिला होता त्याचा आपमान आहे. देशातल्या 90 कोटी जनतेचा हा अवमान आहे अशी टीकाही त्यांनी केली.

काय आहे हॅकरचा दावा

अमेरिकेतील एका हॅकरने सोमवारी पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकतात, असा खळबळजनक दावा केला होता. सय्यद शुजा असं या हॅकरचं नाव आहे.

सय्यद शुजाने लाईव्ह पत्रकार परिषद घेऊन हा खुलासा केला. त्याने यावेळी अनेक खळबळजनक दावे केले होते. 2014 ची लोकसभेची निवडणूक ही फिक्स होती, असा आरोपही त्याने केला. तसंच 'माझ्याकडे यासंदर्भात पुरावे आहे आणि मी ते दाखवू शकतो', असा दावाही त्याने केला.

तसंच 'दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीतही ईव्हीएम घोळ होणार होता. पण आम्ही तो वेळीच रोखला. त्यामुळे तिथे भाजपचा पराभव झाला होता. आपने 70 पैकी 67 जागा जिंकल्यात', असा दावाही त्याने केला.

ईव्हीम मशीन तयार करणाऱ्या टीममध्ये आपण होतो. त्यामुळे ही मशीन कशी हॅक करायची हे मला माहिती आहे. निवडणूक आयोगाने सांगितल्यास त्यांना दाखवू शकतो, तो म्हणाला.

काही दिवसांपूर्वीच शुजा आणि त्याच्या सहकाऱ्यांवर हल्ला झाला होता. त्यामुळे त्याने आज लंडनमध्ये गुप्तपणे व्हिडिओ कॉन्फरर्सद्वारे पत्रकार परिषद घेतली असं सांगण्यात आलं. शुजा हा आधी इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरशन ऑफ इंडिया लि.चा कर्मचारी होता. त्याने 2009 ते 2014 च्या काळात काम केले.

First published: January 22, 2019, 3:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading