मराठी बातम्या /बातम्या /देश /

7.15 ते 6.55... प्रत्येक क्षणाला सुरू होता वेदनादायी प्रवास

7.15 ते 6.55... प्रत्येक क्षणाला सुरू होता वेदनादायी प्रवास

गेले 8 दिवस ती वेदना सहन करत होती...जखमा इतक्या खोल होत्या की तिच्यासोबत झालेली दुर्देवी घटना तिला सांगताही येत नव्हती की न्यायही मागता येत नव्हता

गेले 8 दिवस ती वेदना सहन करत होती...जखमा इतक्या खोल होत्या की तिच्यासोबत झालेली दुर्देवी घटना तिला सांगताही येत नव्हती की न्यायही मागता येत नव्हता

गेले 8 दिवस ती वेदना सहन करत होती...जखमा इतक्या खोल होत्या की तिच्यासोबत झालेली दुर्देवी घटना तिला सांगताही येत नव्हती की न्यायही मागता येत नव्हता

  • Published by:  Meenal Gangurde

हिंगणघाट, 10 फेब्रुवारी : महाराष्ट्राचं मन सुन्न करणारी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील घटना. प्राध्यापक असलेली ही तरुणी खेड्यावरून हिंगणघाटला जाणं-येणं करत असे. सकाळी ती डबा घेऊन निघाली होती. आणि भररस्त्यात पेट्रोल टाकून तिला जाळण्यात आलं. तेव्हा सकाळचे 7.15 वाजले होते. ती भररस्त्यात जळत होती. त्यानंतर काहीजण धावत आले आणि त्यांनी तिच्या अंगावर पाणी ओतले. त्यानंतर ती जमिनीवर कोसळली आणि सुन्न पडून राहिली. शेजारी तिची बॅग आणि आईने दिलेला डबा अस्ताव्यस्त पडून होता. लोकांनी घाई केली. तिला आगीत लोटणारा नराधम विकेश नगराळे तोपर्यंत पसार झाला होता. तिच्या अंगातून वाफा येत होत्या. चेहरा, छाती हात जळाला होता. या जखमा खोलपर्यंत झाल्या असाव्यात. तिला सकाळी 7.30 पर्यंत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिचं शरीर भाजलं होतं. अंगाची आग आग सुरू होती.

प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी तिला साधारण 8.15 मिनिटांनी नागपूरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात हलविण्यात आलं. यापुढचे 48 तास तिच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आलं होतं. तिची श्वसननलिका भाजली असल्याने श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाला होता. कृत्रिम पाईप टाकून डॉक्टरांनी तिचा श्वास पुन्हा सुरू केला होता. शिवाय तिच्या डोळ्यालाही दुखापत झाली होती. तिच्या चेहरा आणि पूर्ण डावा हात मोठ्या प्रमाणात भाजला होता.  ती तब्बल 40 टक्के भाजली होती. या प्रकरणानंतर  संतप्त महिलांनी त्या नराधमाला आमच्या ताब्यात देण्याची मागणी केली होती. तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र लेकीच्या हक्कासाठी पेटून उठला होता. दुसऱ्या दिवशी ड़ॉक्टरांनी पीडितेवर प्लॅस्टिक सर्जरी करावी लागणार असल्याचे सांगितले. शा पेशंटला इन्फेक्शन हे अतिशय लवकर होतं. त्यामुळे अतिशय काळजी घ्यावी लागते. घटनेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे 5 फेब्रुवारीला मुंबईवरूनही तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करण्यात आलं होतं. आजचा दिवस तिच्यासाठी महत्त्वाचा होता. यावेळी तिच्या आईने नेमका काय प्रकार घडला ते सांगितलं. प्राध्यापक असलेली त्यांची मुलगी ही खेड्यावरून हिंगणघाटला जाणं-येणं करत असे. सकाळी ती डबा घेऊन निघाले होती. हिंगणघाटमधल्या त्या चौकात जेव्हा ती आली त्यावेळी आरोपी विकेश नगराळे हा दडून बसला होता. त्याच्या एका हातात टेंभा होता आणि दुसऱ्या हातात पेट्रोलची बाटली. तिला पाहताच त्याने एका हाताने तिच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि दुसऱ्या हाताने टेंभ्याने आग लावली अशी अंगावर काटा आणणारी घटना त्यांनी सांगितली. याआधाही आरोपी विकेशने तिला त्रास दिला होता. त्यावेळी त्याला समजही दिली होती. त्याच्या पालकांनाही सांगितलं होतं. तिसऱ्या दिवशी म्हणजे 6 फेब्रुवारी रोजी तिच्या प्रकृतीसंदर्भात डॉक्टरांनी मेडिकल बुलेटिन जारी केलं होतं. यामध्ये त्यांनी पीडितेच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली होती.

हिंगणघाट येथील पीडित युवती अजूनही क्रिटिकल अजून इन्फेक्शन होण्याची भीती डॉ. दर्शन रेवनवार व्यक्त केली होती. पीडितेची प्रकृती स्थिर आहे पण चिंताजनक आहे. शुक्रवारी तिची सर्जरी करणार करण्यात येणार असून अद्याप तिने डोळ्यांच्या पापण्या उघडल्या नसल्याची धक्कादायक माहिती डॉक्टरांनी दिली होती. तिच्या सर्जरीमध्येही कॉम्प्लिकेशन वाढण्याची शक्यता आहे तर संसर्गदेखील होऊ शकतो. शुक्रवारी तिची ड्रेसिंग करण्यात येणार असून आज तिला रक्त देण्यात येणार आहे. प्रोटीनचा लॉस नको म्हणून औषधे देण्यात येत आहेत. तर घशाची सूज कमी होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे, असे डॉक्टरांनी मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटले होते. पाच दिवशी 7 तारखेला डॉक्टरांनी पीडितेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती दिली होती. तिच्या डोळ्यांचा वरचा भाग, कानही जळाले होते. तिला बोलता येत नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. सहाव्या दिवशी 8 तारकेला ऑरेंज सिटी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी मेडिकल बुलेटीन जाहीर केले. त्यानुसार पीडित तरुणी व्हेंटिलेटरवर असून तिची प्रकृती आणखी खालावली आहे. तिला नळीच्या माध्यमातून जेवण दिले जात होते. डॉ.दर्शन रेवनवार यांनी सांगितल्यानुसार तिचा युरिन आऊट चांगला आहे. डोळ्याचा भाग सध्या स्थितीत बरोबर आहे, दृष्टी कायम आहे. प्रकृतीत फार सुधारणा नाही परिस्थिती तशीच आहे. काही सुधार होत आहे. ऑपरेशन आज करणार होतो ते उद्याला करणार अशी माहिती दिली. कृत्रिमरित्या जेवण देत आहोत ते व्यवस्थित घेत नसल्याचे सांगण्यात आले होते.

आज घेतला अखेरचा श्वास

आज सकाळी 6.55 मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला. याबाबत डॉक्टरांनी मेडिकल बुलेटिन घेतले. सकाळी 4 वाजेपर्यंत तिची तब्येत अधिक खालावली होती. यामुऴे व्हेंटिलेटरचा पॉवर वाढविण्यात आला होता. रक्तदाबही कमी झाला होता. ह्रदयाचे ठोके कमी होत होते. मात्र तिला वाचवता आलं नाही. आज सकाळी 6.55 मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला. शरीरातील अवयव निकामी झाल्याने तिचा मृत्यू झाला आहे. तिचे ह्रदय, मूत्रपिंड, यकृत निकामी झाले होते. दोनवेळा तिच्या ह्दयाचे ठोके बंद झाले होते. मात्र तिला वाचविण्यात आम्हाला त्यात यश आलं नाही, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

First published:

Tags: Hinganghat, Victim