मुंबई हल्ल्यानंतर सरकार शांत बसलं, आम्ही पुलवामाचा बदला घेतला - पंतप्रधान

मुंबई हल्ल्यानंतर सरकार शांत बसलं, आम्ही पुलवामाचा बदला घेतला - पंतप्रधान

या आधी लष्कराकडून सरकारकडे कारवाई करण्याची परवानगी मागण्यात येत होती मात्र तत्कालीन सरकारने प्रत्येक वेळी लष्कराला ही परवानगी दिली नाही.

  • Share this:

कन्याकुमारी 1 मार्च  : भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढलेला असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी विरोधीपक्षांवर हल्लाबोल केलाय. कन्याकुमारी इथं शुक्रवारी झालेल्या जाहीर सभेत त्यांनी देशाच्या सुरक्षेची तडजोड होणार नाही असं निक्षून सांगितलं

पंतप्रधान म्हणाले, मुंबईवरच्या 26/11च्या हल्ल्यानंतर सरकारने काहीही केलं नाही. मात्र आम्ही उरी आणि पुलवामाचा बदला घेतला. या आधी लष्कराकडून सरकारकडे कारवाई करण्याची परवानगी मागण्यात येत होती मात्र तत्कालीन सरकारने प्रत्येक वेळी लष्कराला ही परवानगी दिली नाही.

भारतीय लष्कराने जे शौर्य दाखवलं, धैर्य दाखवलं त्याला माझा सलाम असंही मोदी म्हणाले. काही लोकांच्या वक्तव्यांमुळे पाकिस्तानला फायदा होत आहे. त्यांची वक्तवे पाकिस्तानी संसदेत आणि तिथल्या माध्यमांमध्ये चर्चेला येत आहेत. अशी वक्तवे करणारी मंडळी सैन्याला फायदा मिळवून देत आहेत की पाकिस्तानला असा सवालही त्यांनी केला.

काही लोक मोदींचा व्देष करण्यात एवढे गढून गेलेत की ते पाकिस्तानचं समर्थन करत आहेत. दहशतवादाविरूद्धच्या लढाईत सर्व जग भारताचं समर्थन करत आहे. मात्र विरोधीपक्ष या लढाईवर संशय घेत आहेत असा आरोपही त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 1, 2019 08:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading