12 डिसेंबर : गुजरात निवडणुकीच्या प्रचारात सर्वच पक्षीयांनी एकमेकांवर प्रचंड चिखलफेक केल्याचं पाहण्यास मिळालं. पण, यात सर्वात आघाडी घेतली ती ओबीसी एकता मंचाचे नेते अल्पेश ठाकूर यांनी. पंतप्रधान मोदी दररोज चार लाखांचे मशरूम खातात म्हणून त्यांचे गाल लाल आहे अशी टीकाच अल्पेश ठाकोर यांनी केलीये.
गुजरात निवडणुकीसाठी प्रचार तोफा आज थंडावल्यात. मंदिर दर्शनापासून ते पाकिस्तानच्या मदतीपर्यंत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले. ओबीसी एकता मंचाचे नेते अल्पेश ठाकोर यांनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाण्यापिण्यावरच टीका केलीये. गेल्या काही दिवसांपासून मोदींच्या तब्येतीचं रहस्य काय आहे याचा मी विचार करतोय. 35 वर्षांपूर्वी मोदींचा फोटो पाहिला तर त्यांचा रंग माझ्यासारखा सावळा होता. पण आता पंतप्रधान झाल्यावर त्यांचा रंग उजळलाय. त्यांचे गाल लाल झाले आहे. याबद्दल मी जेव्हा चौकशी केली तेव्हा कळालं की, मोदी दररोज चार लाखांचे मशरूम खातात अशी टीका ठाकोर यांनी केली.
अल्पेश ठाकोर एवढ्यावरच थांबले नाही. मोदी जे मशरूम खातात ते तैवान येथून येतात. एका मशरूमची किंमत ही 80 हजार आहे. मोदी दिवसाला चार मशरूम खातात. एका महिन्याचा हिशेब केला तर एक कोटी 20 लाख रूपयांचे मशरूम खातात असा दावाही ठाकोर यांनी केला.
#WATCH Modi Ji eats mushrooms from Taiwan, one mushroom costs Rs 80 thousand & he eats 5 mushrooms a day. He was dark like me but he became fair because of imported mushrooms: Alpesh Thakor, activist & Congress leader #GujaratElection2017 pic.twitter.com/jh5QPN27SD
— ANI (@ANI) December 12, 2017