मराठी बातम्या /बातम्या /देश /पंतप्रधानांच्या घोषणेपूर्वीच नितीन गडकरींची 'आत्मनिर्भरता', नागपुरात आधीच करून दाखवलं!

पंतप्रधानांच्या घोषणेपूर्वीच नितीन गडकरींची 'आत्मनिर्भरता', नागपुरात आधीच करून दाखवलं!

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली, शिवाय जनतेला आत्मनिर्भरतेचा नारा दिला.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली, शिवाय जनतेला आत्मनिर्भरतेचा नारा दिला.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली, शिवाय जनतेला आत्मनिर्भरतेचा नारा दिला.

मुंबई, 12 मे : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 20 लाख कोटी रुपयांची आर्थिक पॅकेजची घोषणा केली. यावेळी त्यांनी जनतेला आत्मनिर्भर भारताचा नारा दिला आहे. यावेळी त्यांनी भारताने अधिक स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. ते यावेळी म्हणाले की, कोरोना संकटाच्या आधी एकही PPE किट बनत नव्हती. N-95 मास्कचं उत्पादन अगदी कमी होतं. आता स्थिती आहे, की भारतात दररोज 2 लाख PPE किट आणि मास्कचं उत्पादन होत आहे. यानंतर देशाने अधिक आत्मनिर्भर होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी यापूर्वीच नागपूरात कोरोनाच्या संकटासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तू तयार केल्या आहेत. नितीन गडकरी यांनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत यासंदर्भातील माहिती दिली. त्यानुसार त्यांनी नागपूराला एकाकडून सीएसआरमधून 1 कोटी रुपये घेतले. त्यातून त्यांनी 15000 पीपीई किट घेतल्या आणि अनेक रुग्णालयांना त्या मोफत दिल्या. नागपूरात एमईसीएमचा रेडिमेंट गारमेंट झोन आहे. तिथे 1200 महिला काम करतात. महाराष्ट्रात हव्या तेवढ्या पीपीई किट्स केवळ नागपुरातून मिळू शकतात, असेही गडकरी यावेळी म्हणाले. ते पुढे जाऊन असंही म्हणाले की, पीपीई किट्सची किंमत 1200 रुपये होती. त्या येथे 650 रुपयांमध्ये मिळतात. त्याला मंजुरी मिळाली आहे. त्याबाबत सर्व अहवाल आहेत. गरज लागल्यास मुंबईत कमीतकमी 25000 प्रतिदिन ताबडतोब 2 ते 3 लाख किट्स पाठवता येतील. इतकचं नाही तर साखर कारखान्यांना सॅनिटायझर तयार करण्याची परवानगी दिली असल्याचे गडकरींनी सांगितले.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारखान्यांमधून गडकरींनी 1 लाख सॅनिटायझरच्या बाटल्या मोफत वाटल्या. जे पूर्वी 1200 रुपये लिटरला विकलं जात होतं ते आता 400 रुपये लिटरने विकलं जात आहे. राज्य सरकारकडून याची किंमत 500 रुपये ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आता पीपीई किट्स आणि सॅनिटायझरची कमतरता नाही, अशी पुस्ती गडकरींनी जोडली.  नितीन गडकरींनी नागपूरात यांसारख्या सुविधा घडवून आणल्या आहेत. मोदींच्या घोषणेपूर्वीच नितीन गडकरींनी आत्मनिर्भरतेचं एक आदर्शवत उदाहरण दिलं आहे, असं म्हणता येईल.

संबंधित -मोदींची सर्वात मोठी घोषणा; 20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजमुळे कोणाला होईल फायदा?

संपादन - मीनल गांगुर्डे

First published:
top videos

    Tags: Corona virus in india