News18 Lokmat

निजामाचे 8 कोटी कोणाला मिळणार? पाकिस्तानविरुद्धच्या लढाईत भारताचे पारडे जड! India | Pakistan | UK Court | Hyderabad Nizam | Nizam

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात एक लढाई सुरु आहे, जी आता निर्णायक स्थितीत पोहोचली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 26, 2019 02:28 PM IST

निजामाचे 8 कोटी कोणाला मिळणार? पाकिस्तानविरुद्धच्या लढाईत भारताचे पारडे जड! India | Pakistan | UK Court | Hyderabad Nizam | Nizam

नवी दिल्ली, 26 जून: देशाची फाळणी होऊन 70 वर्ष झाली. ब्रिटिशांनी सत्ता सोडताना भारत आणि पाकिस्तान या दोन देशांची निर्मिती केली. या दोन्ही देशात एक लढाई सुरु आहे, जी आता निर्णायक स्थितीत पोहोचली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात 35 मिलियन पौंड अर्थात 8 कोटींसाठी गेल्या अनेक दशकापासून लढाई सुरु आहे. इंग्लंडच्या एका न्यायालयात या 8 कोटींसाठी सुनावणी सुरु आहे. पुढील 6 आठवड्यात यासंदर्भातील निर्णय होण्याची शक्यता आहे.

कोणाचा आहे हा पैसा?

तब्बल 8 कोटी सुरु असलेल्या या खटल्यासाठी भारत आणि पाकिस्तान अनेक वर्षापासून लढत आहे. हा पैसा आहे हैदराबादच्या निजामाचा आहे. निजामाने 1948 साली लंडनच्या नेटवेस्ट बँकेत 10,07,940 पौड (जवळ जवळ 8 कोटी 87 लाख रुपये) पाठवले होते. आता ही रक्कम तीन अब्जावर पोहोचली आहे. तेव्हाच्या हैदराबादच्या निजामाला नव्याने निर्माण झालेल्या पाकिस्तानशी आपुलकी होती. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर तेथे पैशाची कमतरता असल्याचे अनेकांकडून त्यांना कळत होते. अशा परिस्थितीत सर्वांची नजर हैदराबादचा निजामाच्या संपत्तीवर होती. तेव्हाच्या कायद्यानुसार भारतातून थेट पाकिस्तानामध्ये पैसे पाठवता येत नव्हते. त्यामुळेच निजामने पाकिस्तानचे इंग्लंडमधील उच्चायुक्त हबीब इब्राहिम रहीमटोला यांच्या लंडनमधील बँकेत पैसे पाठवले. पण भारतातील निजामाचे वंशजांनी त्यावर दावा ठोकला. हे सर्व वंशज भारताचे समर्थक होते.

त्यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचले तेव्हा खटला पाकिस्तानी उच्चायुक्त विरुद्ध सात जण असा झाला. यात निजामाचे वंशज, भारत सरकार आणि भारताचे राष्ट्रपती यांचा देखील समावेश आहे. न्या. मार्कस स्मिथ यांच्या कोर्टातील हा खटला आता निर्णायक स्थित पोहोचला आहे. अनेक दशकांपासून सुरु असलेल्या या खटल्यात भारताचे पारडे जड आहे. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे हा पैसा ज्यांचा आहे ते निजामाचे वंशज भारताच्या बाजूने आहेत. या खटल्याची अखेरची सुनावणी सुरु असताना असे चित्र होते की खटल्याचा निकाल पाकिस्तानच्या बाजूने लागणार नाही.

Loading...

लंडनच्या न्यायालयात निजामाची वकील पॉल हेव्हिट म्हणाले, रॉयल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये आता लवकर निर्णय होऊ शकतो. पुढील महिन्यात यासंदर्भात अंतिम सुनावणी होऊ शकते. या खटल्यात आठवे निजाम युवराज मुकर्रम जेह आणि त्यांचे छोटे भाऊ मुफाखाम जेह भारताच्या बाजूने आहेत. या दोघांच्या आजोबांनीच 8 कोटी रुपये पाकिस्तान सरकारसाठी पाठवले होते.

VIDEO: साखर झोपेत असलेल्या 4 मुलांना भरधाव कारनं चिरडलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 26, 2019 02:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...