काश्मीरला जाणार युरोपमधले बडे नेते, मोदी आणि डोवल यांचा हा आहे नवा प्लॅन

काश्मीरला जाणार युरोपमधले बडे नेते, मोदी आणि डोवल यांचा हा आहे नवा प्लॅन

युरोपियन युनियनच्या 30 सदस्यांचं शिष्टमंडळ काश्मीर दौऱ्यावर जाणार आहे. या पथकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांची भेट घेतली.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर : युरोपियन युनियनच्या 30 सदस्यांचं शिष्टमंडळ काश्मीर दौऱ्यावर जाणार आहे. या पथकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांची भेट घेतली.

काश्मीरमधलं कलम 370 रद्द केल्यानंतर आता अडीच महिने उलटून गेलेत. आता इथलं जनजीवन पूर्वपदावर येऊ लागलंय. 5 ऑगस्टला इथलं कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

युरोपियन युनियनच्या या सदस्यांची भेट ही वैयक्तिक पातळीवर आयोजित करण्यात आली आहे. ते काश्मीरचे रहिवासी आणि दल लेकमधल्या बोटींच्या मालकांची भेट घेतील. या सदस्यांना काश्मीरमधली खरी परिस्थिती पाहता यावी हा या भेटीमागचा उद्देश आहे.

काश्मीरमध्ये दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, असं नरेंद्र मोदींनी या शिष्टमंडळाच्या सदस्यांना सांगितलं. जम्मू, काश्मीर, लडाख या भागांतली संस्कृती आणि वैविध्य याबदद्लची ओळख या सदस्यांना होईल, असं मोदी म्हणाले. भारताचं बिझनेस रँकिंग 142 वरून 63 वर आलं आहे. हे भारताचं मोठं यश आहे, असं मोदींनी सांगितलं.स्वच्छ भारत आणि आयुष्यमान भारत या दोन मोठ्या योजनांचाही त्यांनी उल्लेख केला. युरोपीय सदस्यांचं हे शिष्टमंडळ उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचीही भेट घेणार आहे.

(हेही वाचा : बेरोजगारी आणि आर्थिक मंदीमुळे अनेक देश अशांत,IMF च्या रिपोर्टमुळे चिंता वाढली)

काश्मीरमधलं कलम 370 हटवल्यानंतर काही काळ तिथे इंटरनेट सेवा बंद होती. आता मात्र लँडलाइन आणि पोस्टपेड सेवा सुरू झाली आहे. इथल्या काही शाळा अजूनही बंद आहेत. मुलांच्या सुरक्षेच्या काळजीमुळे पालक त्यांना शाळेत पाठवायला तयार नाहीत. तरीही वेळापत्रकानुसार परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

===================================================================================

VIDEO: गुडविनमधील गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी, पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आले मालक

Published by: Arti Kulkarni
First published: October 28, 2019, 5:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading