साखर उद्योगासाठी 'गोड न्यूज', तेल कंपन्यांकडून इथेनाॅलच्या दरात वाढ

साखर उद्योगासाठी 'गोड न्यूज', तेल कंपन्यांकडून इथेनाॅलच्या दरात वाढ

राज्यातल्या अंदाजे पावणे २०० पेक्षा जास्त साखर कारखान्यापैकी सरासरी ५२ साखर कारखाने सध्या इथेनॉलचे उत्पादन घेतात

  • Share this:

09 डिसेंबर : तेल कंपन्यांकडून इंधनात मिसळण्यासाठी लागणाऱ्या इथेनॉलच्या मागणी आणि दरात यंदा चांगली वाढ झालीय. परिणामी यावर्षी देशातल्या साखर उद्योगाला किमान ४५०० कोटी रुपयांची अतिरिक्त मिळकत होण्याचा मार्ग खुला झालाय.

राज्यातल्या अंदाजे पावणे २०० पेक्षा जास्त साखर कारखान्यापैकी सरासरी ५२ साखर कारखाने सध्या इथेनॉलचे उत्पादन घेतात. राज्यातल्या या कारखान्यांना यंदा अंदाजे १५०० ते १६०० कोटी रुपयांची कमाई होणार आहे. पर्यायाने साखरेच्या दरात घसरण होत असताना इथेनॉल विक्रीतून कारखान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती इस्मानं दिलीय.

याचा राज्यातल्या शेतकऱ्यांना FRP मिळण्याठी फायदा होणार आहे. यंदा राज्यात आणि देशात साखरेच अतिरिक्त उत्पादन होत आहे. त्यापार्श्वभूमीवर तेल उद्योगाकडून वाढलेल्या मागणीमुळे साखर उद्योगाला काहीसा दिलासा मिळणार असल्याचं स्पष्ट झालंय.

साखर उद्योगाला तेल कंपन्यांचा हात

१. देशात ४५०० कोटी रु. ची मिळकत होणार

२. राज्यातल्या इथेनॉल उत्पादक ५२ कारखान्यांना लाभ

३. राज्यात अंदाजे १५०० ते १६०० कोटी रु. लाभ शक्य

४. शेतकऱ्यांना FRP द्यायला होणार मदत

५. तेल कंपन्यांकडून ११३ कोटी लि. इथेनॉलची मागणी

६. महाराष्ट्रातून अंदाजे ४० कोटी लि. इथेनॉलचा पुरवठा होणार

७. इथेनॉलची खरेदी सरासरी ४० रु. लिटरच्या दराने होणार

First Published: Dec 9, 2017 06:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading