मराठी बातम्या /बातम्या /देश /

'या' देशातल्या पुरुषांना दोन विवाह करणं बंधनकारक; कायदा मोडल्यास होते कडक शिक्षा

'या' देशातल्या पुरुषांना दोन विवाह करणं बंधनकारक; कायदा मोडल्यास होते कडक शिक्षा

 या देशातल्या कायद्यामध्ये पुरुषांनी दोन विवाह करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पुरुषांनी दुसऱ्या विवाहाला नकार दिला तर कायद्याचं उल्लंघन समजून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाते. असा हा देश आहे तरी कोणता?

मुंबई, 13 ऑगस्ट:  विवाह  हे अत्यंत पवित्र बंधन मानलं जातं. अनेक धर्मांमध्ये या बंधनाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे; मात्र जगभरात विवाहाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रथा-परंपरा दिसून येतात. या प्रथा, परंपरांनुसारच विवाह सोहळा पार पडतो. काही ठिकाणी विवाहाच्या विचित्र प्रथा, परंपरा आणि नियम असतात. आफ्रिकी देश असलेल्या इरिट्रियामध्ये विवाहाच्या अनुषंगाने असाच एक विचित्र नियम आहे. या नियमानुसार, इरिट्रियामधल्या पुरुषांना दोन विवाह करावेच लागतात. या देशातल्या कायद्यामध्ये पुरुषांनी दोन विवाह करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पुरुषांनी दुसऱ्या विवाहाला नकार दिला तर कायद्याचं उल्लंघन समजून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाते. अशा प्रकरणात संबंधित पुरुषाला जन्मठेपेची शिक्षादेखील होऊ शकते. तसंच एखाद्या महिलेनं पुरुषाला दुसरा विवाह करण्यापासून रोखलं तर त्या महिलेलादेखील कायद्यानुसार कारावासाची शिक्षा होऊ शकते. या देशात महिलांची संख्या कमी असल्याने अशा प्रकारचा कायदा करण्यात आल्याचं सांगितलं जातं. तसंच यामागे आणखीही काही कारणं आहेत. झी न्यूज हिंदीने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे. इरिट्रिया हा आफ्रिका खंडातला एक देश आहे. असमारा ही या देशाची राजधानी आहे. हा देश संयुक्त राष्ट्रसंघ आणि आफ्रिकन युनियनचाही सदस्य आहे. या देशातल्या पुरुषांना दोन विवाह करणं बंधनकारक आहे. पुरुषांची इच्छा नसली तरी त्यांना दुसरा विवाह करावाच लागतो. एखाद्या पुरुषाला दोन पत्नी नसतील, तर त्याच्याविरोधात न्यायालयात खटला चालवला जातो. हेही वाचा - आधी महिलेने केला पतीचा गेम; 22 महिने सासूला गंडवत राहिली, शेवटी नंदेने केली पोलखोल अशा प्रकरणात संबंधित पुरुषाला जन्मठेपेची शिक्षा होते. या विचित्र कायद्यामुळे इरिट्रियावर वारंवार टीका होत असते. इरिट्रियासारखे नियम इतर देशांमध्ये क्वचितच असतील. विवाहासंबंधित नियमाव्यतिरिक्त या देशात अजूनही काही विचित्र नियमलागू आहेत. त्यामुळे हा देश कायम चर्चेत असतो. इरिट्रियाने असा अनोखा कायदा करण्यामागं काही विशेष कारणं आहेत. या देशात पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या खूप कमी आहे. इथिओपियासोबत असलेलं गृहयुद्ध हे यामागचं मुख्य कारण आहे. इरिट्रियात पुरुषांसाठी दुहेरी विवाह कायद्याशिवाय महिलांसाठीही कठोर कायदे करण्यात आले आहे. या देशातल्या महिला पुरुषांना दोन विवाह करण्यापासून रोखू शकत नाहीत. महिलांनी पुरुषांना दुसरा विवाह करण्यापासून रोखलं तर महिलांनाही कारावासाची शिक्षा होऊ शकते. विवाह आणि महिलांसंदर्भात कठोर नियम, कायदे असल्याने बऱ्याचदा या देशावर टीका केली जाते.
First published:

Tags: Marriage

पुढील बातम्या