पंतप्रधान मोदींवर भडकली 8 वर्षांची मुलगी, धुडकावून लावला सरकारने दिलेला सन्मान

पंतप्रधान मोदींवर भडकली 8 वर्षांची मुलगी, धुडकावून लावला सरकारने दिलेला सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदींना महिला दिनाच्या निमित्ताने 'शी इंस्पायर्स यू' मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र 8 वर्षीय मुलीने पंतप्रधानांना सुनावत नाराजी व्यक्त केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 08 मार्च : हवामान बदलांवर काम करणारी आठ वर्षांची लिकीप्रिया कंगजूमम सध्या नरेंद्र मोदी सरकारवर नाराज आहे. मोदींनी काही दिवसांपूर्वी लिकीप्रियाला प्रेरणा देणारी व्यक्ती असे संबोधले होते. मात्र लिकीप्रियाने या सन्मानाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

गेल्या वर्षी जागतिक बाल शांती पुरस्काराने सन्मानित झालेल्या लिकीप्रियाने माझ्या सन्मानापेक्षा माझं म्हणणे ऐका, असा सल्ला मोदींना दिला आहे. सरकारच्या वतीने लिकीप्रियालची कहाणी 'शी इंस्पायर्स यू' या मोहिमेअंतर्गत सोशल मीडियावर दाखवण्यात आली होती. मात्र लिकीप्रियाने हा सन्मान नाकारण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचा-रुग्णालयातूनच पळाला कोरोनाग्रस्त रुग्ण, पोलिसांनी जारी केला अलर्ट आणि...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करीत लिकीप्रियाने, 'प्रिय पंतप्रधान, तुम्ही जर माझे म्हणणे ऐकणार नसाल तर माझा सन्मान करू नका. 'शी इंस्पायर्स यू' अंतर्गत मला प्रेरणा देणाऱ्या मुली आणि महिलांपैकी एक म्हणून निवडल्याबद्दल धन्यवाद. मी बर्‍याच वेळा विचार केला पण नंतर हा सन्मान न घेण्याचे ठरविले आहे. जय हिंद', असे ट्वीट केले आहे.

वाचा-काँग्रेसच्या नेत्यांचही ‘जय श्रीराम’, उद्धव ठाकरेंसोबत घेणार रामलल्लांचं दर्शन

वाचा-भारत-ऑस्ट्रेलिया फायनलवरही पावसाचे सावट, सामना रद्द झाल्यास काय होणार?

लिकीप्रियाचे ट्विटर अकाउंट तिचे आई-बाबा हॅंडल करतात. मुख्य म्हणजे 'शी इंस्पायर्स यू' हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय महिला दिनी म्हणजे 8 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत ट्वीट करत, ज्या महिलांची कथा प्रेरणा देते अशा महिलांना ते आपले सर्व सोशल मीडिया खाते देणार आहे. यासाठी सरकारचे ट्विटर हँडल चांगल्या काम करून अनेकांना प्रेरणा देणाऱ्या महिलांची कथा शेअर करत आहे.

लिकीप्रिया मणिपूर येथील पर्यावरणवादी कार्यकर्ते आहेत. गेल्या वर्षी त्यांना डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

First published: March 7, 2020, 11:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading