शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशावर बंदी घालण्यास नकार; प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे!

शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशावर बंदी घालण्यास नकार; प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे!

सर्वोच्च न्यायालयाने शबरीमला(Sabarimala) मंदिरासंदर्भात एक मोठा निर्णय दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर: सर्वोच्च न्यायालयाने शबरीमला(Sabarimala) मंदिरासंदर्भात एक मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने मंदिरात महिलांच्या प्रवेशावर बंदी घालण्यास नकार दिला आहे. त्याच बरोबर सर्वोच्च न्यायालया(Supreme Court)ने हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आता या संदर्भातील निर्णय 7 सदस्यीय खंडपीठ करणार आहे. दोन न्यायाधिशांचे या प्रकरणी वेगवेगळी मते झाल्याने याचा निर्णय आता मोठे खंडपीठ करणार आहे.

शबरीमला संदर्भातील खटल्याची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने असे देखील म्हटले की या खटल्याचा परिणाम फक्त मंदिरपुरता मर्यादीत राहणार नाही. तर मशिदमधील महिलांचा प्रवेश, अग्यारीमध्ये पारसी महिलांचा समावेश यावर होणार आहे. परंपरा या धर्माच्या सर्वोच्च नियमानुसार असायला हव्यात असेही मत न्यायालयाने नोंदवले. गेल्या अनेक वर्षांपासून केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश नाही. यावरुन काही संघटनांनी न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी न्यायालयाने महिलांच्या बाजूने निर्णय देत मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी दिली होती. हे प्रकरण परंपरा आणि धर्मासंदर्भातील असल्याचे सांगत सरन्यायाधिश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाच्या निर्णयाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना कोर्टाने महिलांच्या प्रवेशावर बंदी घालण्यास नकार दिला आणि हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवले.

28 सप्टेंबर 2018मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक असा निर्णय देत सर्व महिलांना मंदिरात प्रवेश देण्याचा निकाल दिला होता. लिंगाच्या आधारे महिलांना मंदिरात प्रवेश नाकारने हा एक प्रकारचा भेदभाव असल्याचे तेव्हा कोर्टाने म्हटले होते. अशा प्रकारच्या प्रथेमुळे महिलांच्या मुलभूत अधिकारावर गदा येते. शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यावरून गेल्या काही काळापासून केरळमधील राजकारण तापले आहे.

Published by: Akshay Shitole
First published: November 14, 2019, 11:53 AM IST

ताज्या बातम्या