S M L

मिशन 2019 : काम करायचं नसेल तर चालते व्हा, उर्जामंत्री पियूष गोयल यांचा इशारा

Samruddha Bhambure | Updated On: Apr 11, 2017 12:33 PM IST

मिशन 2019 : काम करायचं नसेल तर चालते व्हा, उर्जामंत्री पियूष गोयल यांचा इशारा

11 एप्रिल : केंद्रीय उर्जामंत्री पियूष गोयल यांनी काल (सोमवारी) उत्तर प्रदेशच्या उर्जा अधिकाऱ्यांची बैठक घेतली. 2018पर्यंत प्रत्येक गावात वीज पोहोचली पाहिजे. ही नवी व्यवस्था आहे, काम करायचं नसेल तर राजीनामे देऊन घरी जा. कोणतीही टाळाटाळ किंवा रिश्वत घेणं खपवून घेतलं जाणार नाही, अशा शब्दांत गोयल यांनी अधिकाऱ्यांना कडक इशारा दिला.

सर्व धर्मांसाठी काम करायचंय आणि सप्टेंबर 2018 पर्यंत काम झालंच पाहिजे, असं गोयल यांनी आपल्या मंत्र्यांना ठणकावून सांगितलं आहे.

भाजपसाठी 2019च्या लोकसभा निवडणुकासाठी उत्तर प्रदेश जिंकणं अतिशय गरजेचं आहे. कारण त्या राज्यात 80 लोकसभेच्या जागा आहेत. प्रत्येक गावात वीज पोहचवू, असं आश्वासन उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान मोदींनी दिलं होतं. त्यामुळेच गोयल एवढे कामाला लागल्याचं दिसतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 11, 2017 12:32 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close