• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • प्रदूषित वायू नव्हे, ऑक्सिजन सोडतं हे इंजिन; भारतीय इंजिनिअरनं केली कमाल

प्रदूषित वायू नव्हे, ऑक्सिजन सोडतं हे इंजिन; भारतीय इंजिनिअरनं केली कमाल

हायड्रोजन घेऊन ऑक्सिजन सोडणाऱ्या इंजिनचा शोध लागल्याचा दावा भारतातील मॅकेनिकल इंजिनिअरनं केला आहे.

 • Share this:
  कोईंबतूर, 11 मे : झाडांपासून ऑक्सिजन मिळतं हे सर्वांना माहित आहे. पण, हायड्रोजन घेऊन ऑक्सिजन देणारं इंजिन असल्याचं तुम्हाला कुणी सांगितल्यास तुम्ही म्हणाल काय मुर्खपणा आहे! इंजिनपासून ऑक्सिजन शक्य आहे का? पण, तामिळनाडूतील कोईंबतूर येथील एका इंजिनिअरनं माझ्याकडे हायड्रोजन घेऊन ऑक्सिजन सोडणारं इंजिन असल्याचा दावा केला आहे. एस. कुमारस्वामी असं या मॅकेनिकल इंजिनिअरचं नाव आहे. तर, त्यांनी तयार केलेलं इंजिन हे डिस्टिल्ड वॉटरवर चालत असल्याची माहिती एस. कुमारस्वामी यांनी दिली आहे. ...तर भर चौकात फासावर जायला तयार– गौतम गंभीर काय म्हणाले एस. कुमारस्वामी हवेतील हायड्रोजन घेऊन ऑक्सिजन सोडणारे इंजिन तयार करण्यासाठी 10 वर्षे लागली. इंधन म्हणून हे इंजिन डिस्टिल्ड वॉटरवर चालतं. त्यातून ऑक्सिजनची निर्मिती होते. हायड्रोजन घेऊन ऑक्सिजन सोडणारं पहिलं इंजिन असल्याचा दावा देखील एस. कुमारस्वामी यांनी केला आहे. ‘मोदींचं काम नव्या नवरीप्रमाणे; बांगड्यांचा आवाजच जास्त’ कुठं होणार इंजिन लॉन्च पुढील काही दिवसांमध्ये हे इंजिन जपानमध्ये लॉन्च होणार असल्याची माहिती एस. कुमारस्वामी यांन दिली. भारतात इंजिनचं लॉन्चिंग करण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी मी भारतातील अनेकांशी संवाद साधला. पण, मला काहीही प्रतिसाद मिळाला नसल्याचं एस. कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मी अखेर जपानचा प्रस्ताव मान्य केल्याची माहिती कुमारस्वामी यांन दिली. VIDEO: काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांना धू-धू धुतलं, पोलिसांनीही केले हात साफ
  First published: