पी. चिदंबरम यांच्याविरोधात EDकडून 'लुक-आउट' नोटीस जारी, तर CBI घेतेय शोध

पी. चिदंबरम यांच्याविरोधात EDकडून 'लुक-आउट' नोटीस जारी, तर CBI घेतेय शोध

आयएनएक्स मीडिया घोटाळाप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्याविरोधात लुक-आउट नोटीस जारी करण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 ऑगस्ट : आयएनएक्स मीडिया घोटाळाप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्याविरोधात लुक-आउट नोटीस जारी करण्यात आली आहे. दरम्यान, पी. चिदंबरम यांना दिल्ली हायकोर्टपाठोपाठ सुप्रीम कोर्टानंही झटका दिला आहे. दिल्ली हायकोर्टानं चिदंबरम यांचा जामीन फेटाळला होता. या निर्णयास त्यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं. पण दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयास स्थगिती देण्यास नकार दिला गेला आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण सुनावणीसाठी सरन्यायाधीशांकडे पाठवण्यात आले आहे. सरन्यायाधीश आज दुपारी चिदंबरम यांच्या जामीन अर्जावर निर्णय देण्याची शक्यता आहे.

दरम्यान, चिदंबरम यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. सीबीआय आणि ईडीचं पथक मंगळवारी (20 ऑगस्ट) संध्याकाळी चिदंबरम यांना अटक करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलं होतं, पण तेव्हा ते घरात नव्हते. यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चिदंबरम यांच्या घराबाहेर नोटीस लावलं. या नोटीसमध्ये पुढील दोन तासांच्या आत हजर होण्याचे आदेश देण्यात आले होते. सीबीआयचं पथक चिदंबरम यांचा शोध घेत आहेत.

(वाचा : राज ठाकरेंच्या पाठीशी उभे राहिले उद्धव, ED च्या चौकशीवर म्हणाले...)

(वाचा : उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश निश्चित, राष्ट्रवादीला लवकरच देणार सोडचिठ्ठी)

सूडभावनेनं त्रास दिला जातोय - प्रियंका गांधी

दरम्यान, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी चिदंबरम यांची पाठराखण केली आहे.  चिदंबरम सत्य बोलत आहेत म्हणून सरकारकडून त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आल्याचा थेट आरोप प्रियंका यांनी केला आहे. प्रियंकांनी ट्विटरवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 'सरकारचं अपयश जनतेसमोर मांडत असल्यामुळे चिदंबरम यांना त्रास दिला जात आहे. पक्ष त्यांच्या पाठीशी आहे. आम्ही कायम लढा देत राहू' असं ट्विट प्रियंका गांधी यांनी केलं आहे.

(वाचा : राष्ट्रवादीत मोठी खळबळ, अजित पवारांचा सगळ्यात जवळचा सहकारी शिवसेनेत?)

नेमकं काय आहे प्रकरण?

एअरसेल मॅक्सिसचा व्यवहार ३ हजार ५०० कोटी रुपयांचा तर आयएनएक्स मीडिया खटल्यात ३०५ कोटी रुपयांचा संबंध आहे. चिदंबरम हे संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री असताना विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाचा हिरवा कंदिल वरील दोन्ही प्रकरणात दिला गेला होता. त्याच वेळी कथित गैरव्यवहार झाल्यामुळे चिदंबरम यांची त्यातील भूमिका चौकशी यंत्रणा तपासत आहेत.

उदनराजे आणि सुनील तटकरे पक्ष सोडण्याची चर्चा, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Published by: Akshay Shitole
First published: August 21, 2019, 1:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading