मराठी बातम्या /बातम्या /देश /कारागृहात बंदी असून 200 कोटींची खंडणी उकळण्याचा होता प्लॅन, Madras Café फेम अभिनेत्रीच्या घरावर EDचा छापा

कारागृहात बंदी असून 200 कोटींची खंडणी उकळण्याचा होता प्लॅन, Madras Café फेम अभिनेत्रीच्या घरावर EDचा छापा

ईडीनं (Enforcement Directorate-ED) दिल्लीतील रोहिणी कारागृहातून (Rohini Jail) चालवल्या जाणाऱ्या खंडणी उकळण्याच्या (Delhi Extortion Case) रॅकेटविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे

ईडीनं (Enforcement Directorate-ED) दिल्लीतील रोहिणी कारागृहातून (Rohini Jail) चालवल्या जाणाऱ्या खंडणी उकळण्याच्या (Delhi Extortion Case) रॅकेटविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे

ईडीनं (Enforcement Directorate-ED) दिल्लीतील रोहिणी कारागृहातून (Rohini Jail) चालवल्या जाणाऱ्या खंडणी उकळण्याच्या (Delhi Extortion Case) रॅकेटविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे

    शंकर आनंद, नवी दिल्ली, 24 ऑगस्ट: केंद्रीय तपास यंत्रणा अंमलबजावणी संचालनालय ईडीनं (Enforcement Directorate-ED) दिल्लीतील रोहिणी कारागृहातून (Rohini Jail) चालवल्या जाणाऱ्या खंडणी उकळण्याच्या (Delhi Extortion Case) रॅकेटविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. तसं हे प्रकरण जुनं आहे. रोहिणी कारागृहातील एका कैद्याद्वारे दिल्लीच्या एका व्यापारी कुटुंबाला फोन करून 200 कोटी रुपयांची खंडणी देण्यासाठी धमकावण्यात येत असल्याची माहिती काही काळापूर्वी दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाला (Delhi Police Special Cell) मिळाली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षासोबत आर्थिक गुन्हे शाखाही या प्रकरणाचा तपास करत होती, परंतु या प्रकरणात मनी लाँडरिंगशी (Money Laundering) संबंधित काही दुवे सापडल्यानं आता ईडीनेही मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

    हे वाचा-सासऱ्यानं सुनेसह 5 जणांची केली निर्घृण हत्या; स्वतः पोलिसांकडे जात सांगितलं कारण

    या प्रकरणात सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) हा मुख्य आरोपी असून, त्यानेच तुरुंगातून दिल्लीतील एका व्यावसायिक महिलेला फोन करून धमकी देऊन कोट्यवधी रुपयांची खंडणी गोळा केली आहे. ईडीच्या मते, सुकेश चंद्रशेखर विरुद्ध डझनापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. तसेच या प्रकरणात मल्याळम चित्रपट अभिनेत्री लीना मारिया पॉल (Leena Mari Paul) हिचाही सहभाग असल्याचे पुरावे ईडीला मिळाले आहेत. तिच्या घरावरही ईडीने छापा टाकला. लीना पॉल सुकेशची पत्नी असून, त्याच्या अनेक गुन्ह्यांमध्ये भागीदार असल्याचे अनेक पुरावे असल्याचे ईडीनं म्हटलं आहे.

    ईडी मुख्यालयातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर गेल्या पाच दिवसांत 18 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट या कालावधीत दिल्ली, चेन्नई आणि इतर अनेक ठिकाणी सतत छापे टाकून सर्व महत्वाची कागदपत्रे, बँक खाती, मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली असून, त्याचा बारकाईनं तपास करण्यात येत आहे. सुकेश चंद्रशेखरच्या सतत संपर्कात असलेला एक मध्यस्थ, एक बँक अधिकारी यांच्या घरावरही छापा टाकला असून, आरबीएल बँकेचा उपाध्यक्ष (RBL bank Vice President) कोमल पोद्दार (Komal Poddar) हाच सुकेशच्या काळ्या पैशाचा व्यवहार करत असल्याचं आढळले आहे. त्याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून सुमारे 83 लाख रुपये रोख आणि 2 किलोंचे सोन्याचे बार जप्त करण्यात आले आहेत. आतापर्यंत सुकेश चंद्रशेखरचे किती कोटी रुपये लपवले आहेत, त्याच्या टोळीत आणखी कोण कोण सामील आहेत. हे जाणून घेण्यासाठी पोद्दारची अधिक चौकशी केली जात आहे.

    हे वाचा-दहशतवाद्याला फोटो काढण्याचा होता 'शौक'; शेवटी त्याचाच फोटो भिंतीवर टांगला

    अभिनेत्री लीना मारिया पॉलच्या घरावरही छापा

    ईडीच्या टीमने ‘मद्रास कॅफे’ या प्रसिद्ध चित्रपटातील अभिनेत्री लीना मारिया पॉल हिच्या (Leena Maria Paul) घरावरही छापा टाकला आहे. लीना पॉल सुकेशची पत्नी असून, त्याच्या अनेक गुन्ह्यांमध्ये भागीदार असल्याचे अनेक पुरावे ईडीकडे आहेत. तिनंही अनेक लोकांची फसवणूक करण्याबरोबरच अनेक आर्थिक गुन्हे केले असल्याचे उघडकीस आलं आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून इतर अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

    First published:
    top videos

      Tags: Delhi