IIT चं हेलिकॉप्टर चीनला देणार दणका; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

IIT चं हेलिकॉप्टर चीनला देणार दणका; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

IIT कानपूर येथे बनवण्यात आलेलं हे हेलिकॉप्टर अतिशय कार्यशम असून भारतीय सैन्याला सीमेवर याची खूप मदत होणार आहे.

  • Share this:

कानपूर, 3 फेब्रुवारी: भारतीय सैन्यात (Indian Army) अत्यंत अत्याधुनिक हेलिकॉप्टर (Helicopter) आणि विमाने उपलब्ध आहेत. परंतु अजूनही अत्याधुनिक उपकरणांचा विकास केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर कानपूरच्या आयआयटीमध्ये (Kanpur IIT) एक अत्याधुनिक हेलिकॉप्टर तयार करण्यात आलं आहे. भारतीय सैन्यासाठी या हेलिकॉप्टरचं खूप महत्त्व असून अवघड मोहिमांमध्ये या हेलिकॉप्टरची मोठी मदत होणार आहे. यामुळे डोंगराळ भागात आणि दुर्गम भागात सैनिकांसाठी मदत पोहोचवणं सोपं होणार असून मेडिकल आणि इतर कारणांसाठी देखील या हेलिकॉप्टरची मोठी मदत होणार आहे.

आयआयटी कानपूरच्या (IIT Kanpur) एरोस्पेस इंजिनीअरिंग विभागाने वैज्ञानिक प्रोफेसर अभिषेक यांच्या देखरेखीखाली या हेलिकॉप्टरची निर्मिती करण्यात आली आहे. इंड्योर-15 (Endure Air15) हेलिकॉप्टर असं याच नाव असून आयआयटी कानपूरने ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा एअर शो असलेल्या एयरो इंडिया 2021 ची (Aero india) आज बँगलोरमध्ये सुरुवात होणार आहे. यामध्ये हे हेलिकॉप्टर आकर्षणाचा केंद्रबिंदू असणार आहे.

या हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या खास वैशिष्ट्यांमुळे या शोमध्ये सगळ्यांचं या हेलिकॉप्टरकडे लक्ष असणार आहे. अवघ्या चार किलो वजनाच्या या हेलिकॉप्टरमध्ये उंच उडण्याची देखील क्षमता आहे. यामुळे भारत - पाकिस्तान आणि भारत - चीन सीमेवर भारतीय सैन्यासाठी या हेलिकॉप्टरची खूप मोठी मदत होणार आहे.

(हे देखील वाचा - राम मंदिरासाठी निधी गोळा करत असल्याचा बनाव, भामट्याविरोधात गुन्हा दाखल)

या हेलिकॉप्टरमध्ये अनेक वैशिष्ट्य असून दहशतवाद्यांचा बिमोड करण्यास भारतीय सैन्याला मोठी मदत होणार आहे. या हेलिकॉप्टरचं डिझाईन हे खास भारतीय सैन्यासाठी करण्यात आलं आहे. सध्या या हेलिकॉप्टरच्या चाचण्या सुरू असून रेस्क्यूमध्ये फायदेशीर ठरण्यासाठी विशेष कॅमेरे बसवण्यात आले आहेत. 15 किलोमीटर दूरवरून देखील व्हिडीओ डेटा पाठवू शकतो. पूर्णपणे स्वदेशी बनावटीचं हे हेलिकॉप्टर व्हर्टिकल लँडिंग आणि टेकऑफ करू शकणार आहे. कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीमध्ये हे काम करू शकणार आहे. मायनस 20 ते 50 डिग्री सेल्सिअसच्या तापमानात देखील हे हेलिकॉप्टर काम करू शकणार आहे. त्यामुळे अतिशय कार्यक्षम असलेलं हे हेलिकॉप्टर डोंगराळ भागात खूपच फायदेशीर ठरणार आहे.

Published by: Aditya Thube
First published: February 3, 2021, 4:25 PM IST

ताज्या बातम्या