शोपियां, 29 मे: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरले आहे. शोपियां जिल्ह्यातील पिंजुरा गावात आणि जैनपोरा सेक्टरमध्ये तर कुलग्राम जिल्ह्यातील मोहम्मद पोरा परिसरात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरले आहे. राज्यात एकाच वेळी 3 ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरु आहे. या तिन्ही ठिकाणी दहशतवादी हलचाली सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई सुरू करण्यात आली आहे. संबंधित परिसरातील प्रत्येक घराची तपासणी केली जात आहे. तसेच नागरिकांना सुरक्षीत ठिकाणी नेले जात आहे.
सुरक्षा दलांना शोपियां आणि कुरग्राम जिल्ह्यातील काही ठिकाणी दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारावर जवानांनी पिंजुरा गावात आणि जैनपोरा सेक्टरमध्ये सर्च ऑपरेशन सुरु केले. तर कुरग्राम जिल्ह्यातील मोहम्मद पोरा येथे सर्च ऑपरेशन सुरू असताना दहशतवाद्यांनी गोळीपार केला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या परिसरात 3 दहशतवादी लवले आहेत. या परिसराला सुरक्षा दलांनी घेरले आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे.
मोहम्मद पोला सेक्टरमधील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. येथे दहशतवाद्यांचा कमांडर लपून बसला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसात राज्यात 86 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. जोपर्यंत दहशतवाद थांबत नाही तोपर्यंत ही कारवाई केली जाईल असे लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी सांगितले.
SPECIAL REPORT: पृथ्वीराज चव्हाणांच्या हाती काँग्रेसची धुरा?