पुलवामात पुन्हा चकमक; भारतीय जवानांनी दोघा दहशतवाद्यांना केले ठार!

पुलवामात पुन्हा चकमक; भारतीय जवानांनी दोघा दहशतवाद्यांना केले ठार!

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथील पंजगाम सेक्टरमध्ये भारतीय जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू आहे.

  • Share this:

जम्मू, 18 मे: दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथील पंजगाम सेक्टरमध्ये भारतीय जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू आहे. सुरक्षा दलांनी तिघा दहशतवाद्यांना घेरले आहे. चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जितके दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती त्यापेक्षा अधिक दहशतवादी असल्याची शक्यता वाटते. दरम्यान सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. तसेच स्थानिक लोकांनी घरात थांबण्याचे आवाहन केले आहे.

सुरक्षादलाला पुलवामामधील पंजगाम सेक्टरमध्ये काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारावर जवानांनी सर्च ऑपरेशन सुरू केले. सुरक्षा जवानांना पाहताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला भारतीय जवानांनी देखील उत्तर दिले. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार दोन दहशतवादी ठार झाले आहेत. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू असल्याने अतिरिक्त जवान घटनास्थळी पाठवण्यात आले आहेत.चकमकीत हिजबूलचा दहशतवादी शौकत अहमद धरचा भारतीय जवानांनी खात्मा केला आहे.

पुलवामासह अनंतनागमध्ये देखील दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे.

पुलवामा आणि शोपियां येथे गुरुवारी झालेल्या चकमकीत 6 दहशतवादी ठार झाले होते. पुलवामामध्ये जैश-ए-मोहम्मदचा नसीर पंडित, उमर मीर आणि खालिद हे मारले गेले होते. खालिद हा जैशचा कमांडर होता तो पाकिस्तानमध्ये राहत होता. अशाच प्रकारच्या दुसऱ्या एका चकमकीत जवानांनी शोपियांमध्ये 3 दहशतवादी ठार मारले. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. या चकमकीत एक जवान देखील शहीद झाला होता.

SPECIAL REPORT : कुंपणावरच्या नेत्यांचं निकालाकडे लक्ष; 23 मेनंतर राजकीय उलथापालथ?

First published: May 18, 2019, 6:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading