MBA शिकलेला तरुण झाला दहशतवादी, लष्कराने घातले कंठस्नान

MBA शिकलेला तरुण झाला दहशतवादी, लष्कराने घातले कंठस्नान

गेल्या तीन वर्षांपासून हा तरुण हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत कार्यरत होता.

  • Share this:

श्रीनगर, 15 जानेवारी :  जम्मू-काश्मीर राज्यातील डोडा जिल्ह्यातील गुंधना या भागात दहशतवादी आणि लष्करात सुरू असलेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा हारुन वाणी हा तरुण ठार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. हारुण वाणी हा तरुण गेल्या तीन वर्षांपासून हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत कार्यरत होता. शिवाय त्याचे MBA पर्यंतचे शिक्षण झाल्याची माहिती समोर आली आहे. हारुणबरोबर आणखी एका दहशतवाद्याला पकडण्यात लष्कराला यश आलं आहे. पकडण्यात आलेल्या दहशतवाद्याची माहिती मिळू शकलेली नाही. अद्यापही डोडा जिल्ह्यात दहशतवादी आणि लष्करामध्य़े चकमक सुरू आहे.

तीन दिवसांपूर्वी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली होती. या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीन आणि जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षादलाला यश आले. ठार केलेल्या या दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा हाती लागला आहे. याबाबत रविवारी सकाळी पुलवामा जिल्ह्यातील काही भागात दहशतवादी लपल्याची माहिती लष्कर व सुरक्षादलाला मिळाली होती. त्यानुसार लष्कर आणि सुरक्षादलाने कारवाई करीत दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले. यामध्ये सुरक्षादलाने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेचा उमर फैयाज लोन, आदिल बशीर मीर आणि  जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा फैजान अहमद भट्ट या चकमकीत मारले गेले आहेत.

Published by: Suraj Yadav
First published: January 15, 2020, 1:35 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading