Home /News /national /

Encounter in Jammu Kashmir: अवंतीपोरामध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Encounter in Jammu Kashmir: अवंतीपोरामध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

दक्षिण काश्मीरच्या (South Kashmir) अवंतीपोरा (Avantipora Tral) त्रालमध्ये आज सकाळी सुरक्षा दलाला (security forces) मोठं यश मिळालं आहे.

    श्रीनगर, 06 एप्रिल: दक्षिण काश्मीरच्या (South Kashmir) अवंतीपोरा (Avantipora Tral) त्रालमध्ये आज सकाळी सुरक्षा दलाला (security forces) मोठं यश मिळालं आहे. येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या भागातील ऑपरेशन संपल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी (Jammu and Kashmir Police) दिली आहे. ठार केलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह आणि चकमकीच्या ठिकाणाहून जप्त केलेली शस्त्रे सुरक्षा दलांनी ताब्यात घेतली आहेत. दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. या भागात आणखी कोणतेही दहशतवादी नसल्याची पुष्टी झाल्यावर सुरक्षा दलांनी ऑपरेशन संपल्याची घोषणा केली. एका ट्विटवर याची पुष्टी करताना जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितलं की, अवंतीपोरा येथील त्राल भागात झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांमध्ये अन्सार गजवतुल हिंदचा दहशतवादी सफात मुझफ्फर सोफी उर्फ ​​माविया आणि लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी उमर तेली उर्फ ​​तल्हा यांचा समावेश आहे. गेल्या महिन्यात खानमोह येथील सरपंच समीर अहमद यांच्या हत्येतही या दोघांचा सहभाग होता. गोरखनाथ मंदिर हल्ल्यासंदर्भात नवा खुलासा! मुर्तझाच्या घरातून Airgun जप्त पोलिसांनी सांगितले की, अवंतीपोरा येथील त्राल भागात दहशतवादी दिसल्यानंतर एसओजी, आर्मी आणि सीआरपीएफच्या जवानांनी येथे संयुक्त कारवाई केली होती. सुरक्षा दलाचे जवान जेव्हा दहशतवाद्यांचा शोध घेत होते, तेव्हा लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांना त्यांच्या जवळ येत असल्याचे पाहून त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांनी प्रत्युत्तर देण्यापूर्वी दोन्ही दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याची संधी दिली मात्र त्यांनी शस्त्रे ठेवण्यास नकार दिल्यावर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल त्यांच्यावर गोळीबार केला. सुरुवातीच्या चकमकीत सुरक्षा दलांनी एक दहशतवाद्याला ठार केलं. यानंतर सुरक्षा दलांनी दुसऱ्या दहशतवाद्याला पुन्हा एकदा आत्मसमर्पण करण्याची संधी दिली, मात्र यावेळीही त्याने प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरू ठेवल्यानं सुरक्षा दलांनी त्यालाही ठार केलं. दोन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले आहेत. चकमकीच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Jammu and kashmir, Terrorist attack

    पुढील बातम्या