हैदराबाद पोलिसांनी केलेला एन्काऊंटर संशयास्पद, उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया

हैदराबाद पोलिसांनी केलेला एन्काऊंटर संशयास्पद, उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया

घटनेचा तपास करताना आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यात त्यांचा मृत्यू झाला. पण या सगळ्या घटनेवर आता प्रश्न उपस्थित होत आहेत.

  • Share this:

हैदराबाद, 06 डिसेंबर : हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी पोलिसांनी आरोपींचा केलेला एन्काऊंटर हा संशयास्पद असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ विधीज्ज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. 'सामान्य नागरिकांना याचा आनंद झाला ही गोष्ट मान्य आहे. पण गोळीबार झाला यावर अद्याप हैदराबाद पोलिसांनी कोणतंही पत्रक काढलं नाही. ऐवढ्या मोठ्या प्रकरणात चौकशीसाठी जाताना पोलिसांचा फौजफाटा असणार. आरोपीला बेड्या घातलेल्या असणार, अशात तर आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला तर त्याला पकडण्याचा प्रयत्न का केला गेला नाही' असा प्रश्न उज्ज्वल निकम यांनी उपस्थित केला आहे.

हैदराबाद एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह, पोलिसांविरोधात FIR दाखल करण्याची मागणी

घटनेचा तपास करताना आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यात त्यांचा मृत्यू झाला. पण या सगळ्या घटनेवर आता प्रश्न उपस्थित होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे वकील वृंदा ग्रोव्हर यांनी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्या म्हणाल्या की, पोलिसांवर गुन्हा दाखल करावा आणि संपूर्ण प्रकरणात स्वतंत्र न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. महिलेच्या नावाखाली कोणत्याही प्रकारचा पोलीस एन्काऊंटर करणं चुकीचं असल्याचं वृंदा यांनी म्हटलं आहे.

इतर बातम्या - हैदराबाद एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह, पोलिसांविरोधात FIR दाखल करण्याची मागणी

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी देखील यावर प्रश्न उपस्थित केला आहे. त्या म्हणाल्या की, 'एन्काऊंटर नेहमीच बरोबर नसतात. या प्रकरणातील पोलिसांच्या दाव्यानुसार आरोपी बंदूक हिसकावून पळ काढत होते. अशात कदाचित पोलिसांना गोळ्या झाडण्याचा निर्णय योग्य असावा. आमची मागणी होती की, आरोपींना फाशी देण्यात यावी, परंतु कायदेशीर प्रक्रियेअंतर्गत. आम्हाला लवकर न्याय मिळावा अशी इच्छा होती पण ते केवळ संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेद्वारे कारवाई करून. आज लोक एन्काऊंटरमुळे आनंदी आहेत, परंतु आपल्याकडे संविधान, कायदेशीर प्रक्रिया आहे.' असंही त्या म्हणाल्या.

इतर बातम्या - हैदराबाद एन्काऊंटरमागे या IPS अधिकाऱ्याचा हात, त्यांनी सांगितलेली INSIDE STORY

हैदराबाद पोलिसांकडून यूपी पोलिसांनी शिकलं पाहिजे

या प्रकरणात बहुजन समाज पार्टीचे (बीएसपी) राष्ट्रीय अध्यक्ष मायावती म्हणाल्या की, बलात्कार करणार्‍यांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडून शिकले पाहिजे. मी मुख्यमंत्री असताना माझ्या पक्षाच्या आरोपी लोकांनाही तुरूंगात पाठवले होते. उत्तर प्रदेश आणि दिल्ली पोलिसांनी त्यांचा दृष्टीकोन बदलला पाहिजे.

मोठी बातमी - हैदराबाद प्रकरण: सीन रिक्रिएट, हल्ला आणि पोलीस चकमक; रात्रीचा संपूर्ण घटनाक्रम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 6, 2019 11:46 AM IST

ताज्या बातम्या