Elec-widget

भाजपच्या जाहीरनाम्यात रोजगार गायब पण उद्योगांवर भर

भाजपच्या जाहीरनाम्यात रोजगार गायब पण उद्योगांवर भर

भाजपने आपल्या जाहीरनाम्यात रोजगाराचा थेट उल्लेख केलेला नाही पण शेतकरी, औद्योगिक क्षेत्र आणि पायाभूत संरचना यावर मात्र भर दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 एप्रिल : लोकसभा निवडणुकीत यावेळी रोजगाराचा मुद्दा गाजला. भाजपने दिलेल्या वचनाप्रमाणे रोजगार दिले नाहीत, अशीही टीका झाली. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात रोजगाराचा थेट उल्लेख केलेला नाही. पण शेतकरी, औद्योगिक क्षेत्र आणि पायाभूत संरचना यावर मात्र भर दिला आहे.

या मुद्द्यावर देत काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे. भाजपने रोजगार आणि काळ्या पैशाचं नेमकं काय करणार, याचा कोणताही उल्लेख या जाहीरनाम्यात केलेला नाही, असं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले.

मोठमोठ्या गप्पा करून लोकांना सापळ्यात अडकवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. देशभरात 4 कोटी 70 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या या आकडेवारीकडे सुरजेवाला यांनी लक्ष वेधलं. या जाहीरनाम्यात कुठेही नोटबंदीचा उल्लेख नाही, अशी टीका त्यांनी केली.

उद्योगांवर भर

भाजपने रोजगार देण्याबदद्ल स्पष्ट वचन दिलेलं नाही पण भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी उद्योगांना 50 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची तरतूद केली आहे. पायाभूत संरचनांसाठी 100 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि पायाभूत संरचनांमध्ये एक लाख रोटी रुपयांची कर्जहमी योजनाही जाहीर केली आहे.

Loading...

तरुणांसाठी स्टार्टअप आणि कौशल्य विकास कार्यक्रमांवर भाजपने भर दिला आहे. तरुणांसाठी खेलो इंडिया यासारख्या योजनांचीही घोषणा पक्षाने केली आहे. 2024 पर्यंत डॉक्टरांची संख्या दुप्पट केली जाईल, असंही भाजपने म्हटलं आहे.

काँग्रेसने काय दिलं वचन ?

भाजपच्या जाहीरनाम्यात रोजगाराचा उल्लेख नसला तरी काँग्रेसने मात्र आपल्या जाहीरनाम्यात २२ लाख सरकारी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यासोबतच 10 लाख लोकांना ग्रामपंचायतीत रोजगार देण्याचीही हमी दिली आहे. ग्रामीण भागातल्या रोजगारांच्या दृष्टीने मनरेगा योजनेचा लाभ घेण्याचं आश्वासन दिलं आहे. या जाहीरनाम्यातल्या योजना नेमक्या कशा पूर्ण होतील हा मात्र प्रश्नच आहे.

==============================================================================================================================================================

VIDEO : गडकरींच्या नागपुरातील तरुण म्हणतात नोकऱ्या कुठे?



बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2019 05:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...