आयडियाची कल्पना! सरकारी ऑफिसमध्ये चक्क हेल्मेट घालून बसले कर्मचारी

आयडियाची कल्पना! सरकारी ऑफिसमध्ये चक्क हेल्मेट घालून बसले कर्मचारी

ऑफिसमध्ये कधी हेल्मेट घालून काम केले आहे? हे PHOTO पाहून तुम्हीही व्हाल हैराण.

  • Share this:

बांदा (उत्तर प्रदेश), 06 नोव्हेंबर : वाहतुकीच्या नियमात बदल झाल्यानंतर तुम्ही रस्त्यावर हेल्मेट घातलेले वाहनचालक तुम्ही पाहिले असतील. पण कधी सरकारी ऑफिसमध्ये हेल्मेट घालून कोणाला काम करताना पाहिले आहे का? नाही ना. पण भारतात असा प्रकार घडला आहे. या सगळ्या प्रसंगाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

उत्तर प्रदेशच्या (UP) बांदा (Banda) येथील वीजवितरण विभागातील कर्मचारी चक्क हेल्मेट घालून काम करताना दिसले. हे चित्र पाहून वीज बिल भरण्यासाठी आलेले ग्राहकी चकित झाले. वीजवितरण विभागातील कर्मचाऱ्याचे हेल्मेट घालून बसण्याचे कारणही तसे गंभीर होते. हे कर्मचारी, ऑफिसमधील छप्पर तुटेल आणि डोक्यावर पडेल या भितीनं हेल्मेट घालून बसले होते. आज पूर्ण दिवस हे सर्व कर्मचारी हेल्मेट परिधान करूनच काम करत होते. तब्बल 2 वर्ष छप्परचे काम न झाल्यामुळं लोकांना हेल्मेट घालून काम करावे लागत आहे.

एएनआयनं फोटो ट्वीट केले. या फोटोमध्ये कर्माचाऱ्यांनी सुरक्षा म्हणून रस्त्यावर नाही तर ऑफिसमध्ये हेल्मेट घालण्याची कल्पना आजमावली. ट्विटरवर या कर्मचाऱ्यांच्या कल्पनेचे विशेष कौतुक केले जात आहे.

एका कर्मचाऱ्यानं एएनआयला दिलेल्या माहितीत, “2 वर्षांपासून ऑफिसची अशीच परिस्थिती आहे. मी 2 वर्षांपूर्वी कामाला आलो होती, तेव्हाही असेच ऑफिस होते. आम्ही बऱ्याच वेळा अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र अजून छप्पर दुरुस्त करण्यात आलेले नाही”, असे सांगितले.

दरम्यान सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अधिकाऱ्यांच्या या कल्पनेचे कौतुक तर सरकारवर टीका केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 6, 2019 10:43 AM IST

ताज्या बातम्या