वायूदलाचे कॉर्पोरल जेपी निराला यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान; राष्ट्रपतीही झाले भावूक!

वायूदलाचे कॉर्पोरल जेपी निराला यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान; राष्ट्रपतीही झाले भावूक!

कॉर्पोरल ज्योती प्रकाश निरालांना मरणोत्तर अशोक चक्रानं सन्मानित करण्यात आलं. त्यांची आई आणि त्यांच्या पत्नीनं राष्ट्रपतींकडून हे शौर्यपदक स्वीकारलं आहे.

  • Share this:

26 जानेवारी : प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या आधी एक अतिशय भावनिक सोहळा पार पडला. कॉर्पोरल ज्योती प्रकाश निरालांना मरणोत्तर अशोक चक्रानं सन्मानित करण्यात आलं. त्यांची आई आणि त्यांच्या पत्नीनं राष्ट्रपतींकडून हे शौर्यपदक स्वीकारलं आहे. पदक दिल्यावर राष्ट्रपती कोविंद यांच्या डोळ्यातही अश्रू आले होते.

वायूदलातले कॉर्पोरल निराला गेल्या नोव्हेंबरमध्ये काश्मीरमधल्या चकमकीत शहीद झाले होते. ते केवळ 31 वर्षांचे होते. बंदीपुरामध्ये एका घरात 6 दहशतवादी लपून बसले होते. लष्करानं घराला घेरलं. या विशिष्ठ ऑपरेशनसाठी कॉर्पोरल निराला लष्कराबरोबर होते. ऑपरेशन सुरू असताना त्यांना गोळ्या लागल्या. पण तरीही ते मागे हटले नाहीत. त्यांनी 2 दहशतवाद्यांना ठार मारलं, तर दोघांना जखमी केलं. त्यामुळे 6 पैकी एकही दहशतवादी पळू शकला नाही. आणि सर्व सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं.

या हल्ल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, कॉर्पोरल निरालांनी अशा ठिकाणी सापळा रचला, जिथे त्यांच्या जीवाला खूप जास्त धोका होता. पण त्याची पर्वा न करता, दहशतवाद्यांना पकडण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला. त्यांच्या या शौर्यासाठी त्यांना मरणोत्तर अशोक चक्रानं सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या आई आणि पत्नीनं जेव्हा हे पदक स्वीकारलं, तेंव्हा कोट्यवधी लोकांच्या डोळ्यात अश्रू होते. निराला यांचा हा लढा प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या शौर्याला न्यूज 18 लोकमतचाही सलाम!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 26, 2018 03:59 PM IST

ताज्या बातम्या