मराठी बातम्या /बातम्या /देश /

अमेरिकेसाठी उड्डाण केलेल्या एअर इंडियाच्या विमानात उडताना दिसलं वटवाघूळ, वाचा पुढे काय घडलं

अमेरिकेसाठी उड्डाण केलेल्या एअर इंडियाच्या विमानात उडताना दिसलं वटवाघूळ, वाचा पुढे काय घडलं

एअर इंडियाच्या (Air India Flight) एका विमानाला गुरुवारी दिल्ली विमानतळावरुन (Delhi Airport) उड्डाण केल्यानंतर काहीच वेळात माघारी परतावं लागलं. याचं कारण होतं, की वैमानिकानं एअर ट्राफिक कंट्रोलकडे विमानात वटवाघूळ (Bat) असल्याची तक्रार केली होती.

पुढे वाचा ...
  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 29 मे : एअर इंडियाच्या (Air India Flight) एका विमानाला गुरुवारी दिल्ली विमानतळावरुन (Delhi Airport) उड्डाण केल्यानंतर काहीच वेळात माघारी परतावं लागलं. याचं कारण होतं, की वैमानिकानं एअर ट्राफिक कंट्रोलकडे विमानात वटवाघूळ (Bat) असल्याची तक्रार केली होती. या घटनेनंतर तात्काळ विमानाचं (Plane) दिल्ली विमानतळावर लँडिंग करण्यात आलं. डीजीसीए अधिकाऱ्यांनी सांगितलं, की विमानात धूर पसरवून नंतर मृत वटवाघूळाला बाहेर काढण्यात आलं. विमानन कंपनीच्या सूत्रांनी सांगितलं, की याबाबत इंजिनिअरिंग टीमला विस्तृत रिपोर्ट मागितला गेला आहे.

एअर इंडियाच्या या विमानानं पहाटे 2:20 ला अमेरिकेसाठी उड्डाण केलं. विमानानं उड्डाण करुन अर्धा तासही झाला नव्हता. मात्र, तितक्यात क्रू मेंबर्सला विमानात एका वटवाघूळ दिसलं. यानंतर वैमानिकानं हे विमान तात्काळ दिल्ली विमानतळावर माघारी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. एअर इंडियाच्या अधिकाऱ्यानं एएनआयसोबत बातचीत करताना सांगितलं, की AI-105 DEL-EWR या विमानासाठी लोकल स्टँडबाय इमर्जंसी घोषित करण्यात आली आणि विमान दिल्ली विमानतळावर पुन्हा लँड करण्यात आलं. विमान माघारी आल्यानंतर माहिती मिळाली, की क्रू मेंबर्सला विमानतळावर वटवाघूळ दिसलं होतं. यानंतर त्याला विमानातून बाहेर काढण्यासाठी वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आलं.

PNB Scam: आरोपी मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणास डोमिनिका कोर्टाचा नकार

डीजीसीए अधिकाऱ्यांनी सांगितलं, की वटवाघूळाला विमानातून बाहेर काढण्यासाठी विमानात धूर करण्यात आला. यानंतर मृत वटवाघूळाला बाहेर काढण्यात आलं. डीजीसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं, की विमानात वटवाघूळ असल्यानं या विमानाचं लँडिंग करण्यात आलं. यानंतर या घटनेचा सविस्तर रिपोर्ट विमानन कंपनीनं इंजिनिअर टीमकडे मागितला आहे.

First published:

Tags: Air india, Airplane