पटना, 25 ऑगस्ट : बिहारच्या (Bihar) बक्सरमध्ये (Baxar) हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचं (air force helicopter) इमर्जन्सी लँडिंग (landing) करावं लागलं. या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड (technical problem) झाल्याचं लक्षात आल्यानंतर इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे लँडिंग अत्यंत आव्हानात्मक होतं. या दुर्घटनेत अनेकांचे बळी जाऊ शकले असते, मात्र यशस्वीपणे हेलिकॉप्टरचं लँडिंग करण्यात पायलटला यश आलं. तर दुसऱ्या एका घटनेत राजस्थानमधील (Rajasthan) बाडमेरमध्ये (Badmer) वायुदलाचं मिग-21 विमान क्रॅश (Mig-21 crash) झालं.
अशी झालं इमर्जन्सी लँडिंग
बुधवारी वायूदलाच्या विमानानं अलाहाबादवरून बिहटासाठी उड्डाण केलं होतं. मात्र उड्डाणानंतर काही मिनिटांमध्येच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचं पायलटच्या लक्षात आलं. त्यावेळी हे हेलिकॉप्टर बिहारच्या हद्दीत पोहोचलं होतं. बिहारच्या माणिकपूरमधील एका हायस्कूलच्या मैदानात हेलिकॉप्टर उतरवण्याचा निर्णय पायलटने घेतला. पावसाचे दिवस असल्यामुळे या मैदानात पाणी साठलं होतं आणि चिखलही झाला होता. तरीदेखील या मैदानात पायलटने हेलिकॉप्टरचं लँडिंग केलं. लँडिंग करताना हेलिकॉप्टरची चाकं चिखलात रुतून बसली असून किरकोळ नुकसान झालं आहे. मात्र पायलटच्या या निर्णय़ामुळे हेलिकॉप्टरमध्ये असणाऱ्या सर्वांचे प्राण वाचले आहेत.
20 जणांचे वाचले प्राण
वायूसेनेच्या या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 20 जण होते. त्यापैकी दोनजण हे वर्ग एकचे अधिकारी असल्याचं सांगितले जात आहे, तर इतर कॉन्स्टेबल, सैनिक आणि एसआय दर्जाचे कर्मचारी होते. यातील सर्वजण सुखरूप असून हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाड दूर करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे.
हे वाचा -दारू पिऊन मारझोड करणाऱ्याला कुटुंबानं घडवली अद्दल; न्यायालयही झालं हैराण
मिग-21 चा अपघात
बुधवारीच हवाई उड्डाणाशी संबंधित दुसरा अपघात घडला राजस्थानच्या परिसरात. राजस्थानमधील बाडमेरमध्ये वायुदलाचं मिग-21 विमान क्रॅश झालं. हे विमान चालवणारा पायलट मात्र यातून बचावला असून तो सुखरूप असल्याची माहिती आहे.
पोलीस आणि वायुदलाचे अधिकारी सध्या घटनास्थळी पोहोचले असून रुटीन उड्डाण करत असताना हा अपघात झाला आहे. विमान ज्या ठिकाणी क्रॅश झालं, त्या भागात काही झोपड्या आणि कच्ची घरं होती. विमान त्यावरून घसरत गेल्यामुळे या घरांना आग लागली. स्थानिकांनी माती आणि पाणी टाकून ही आग लगेचच आटोक्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Airplane, Bihar, Helicopter, Rajasthan