मराठी बातम्या /बातम्या /देश /

Elon Musk: एलॉन मस्क यांच्या वडिलांना त्यांच्या सावत्र मुलीपासून झालं दुसरं मूल

Elon Musk: एलॉन मस्क यांच्या वडिलांना त्यांच्या सावत्र मुलीपासून झालं दुसरं मूल

एरॉल मस्क हे 76 वर्षांचे असून, ते दक्षिण आफ्रिकेतले अत्यंत श्रीमंत इंजिनीअर आहेत. त्यांचा सगळा वंशवृक्ष अर्थात Family Tree गुंतागुंतीची आहे.

एरॉल मस्क हे 76 वर्षांचे असून, ते दक्षिण आफ्रिकेतले अत्यंत श्रीमंत इंजिनीअर आहेत. त्यांचा सगळा वंशवृक्ष अर्थात Family Tree गुंतागुंतीची आहे.

एरॉल मस्क हे 76 वर्षांचे असून, ते दक्षिण आफ्रिकेतले अत्यंत श्रीमंत इंजिनीअर आहेत. त्यांचा सगळा वंशवृक्ष अर्थात Family Tree गुंतागुंतीची आहे.

सॅन फ्रान्सिस्को, 15 जुलै : आजच्या तंत्रज्ञानाच्या जगात माणूस जितका प्रगत होत चालला आहे, तितका त्याच्या नातेसंबंधांचा गुंता मात्र वाढत चालला आहे. कोणी कोणाशी लग्न करावं, दोघांच्यात किती अंतर असावं, कोणापासून मूल होऊ द्यावं याचे जुन्या काळातले नियम आज लागू होणार नाहीत. तसंच, त्याबद्दल निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला आहे. या गोष्टी खऱ्या असल्या, तरी आजच्या काळातल्या काही घटना पाहिल्यानंतर मात्र चक्रावूनच जायला होतं. याला संदर्भ आहे तो जगप्रसिद्ध तंत्रज्ञ एलॉन मस्कच्या वडिलांनी नुकत्याच जाहीर केलेल्या एका गोष्टीचा. 76 वर्षांच्या एरॉल मस्क (Errol Musk) यांनी 'द सन'ला नुकत्याच दिलेल्या इंटरव्ह्यूत असं सांगितलं, की त्यांना त्यांच्या सावत्र मुलीपासून तीन वर्षांपूर्वी मुलगी झाली आहे. त्या दोघांच्या वयात तब्बल 41 वर्षांचं अंतर असून, त्यांचं हे दुसरं मूल आहे. त्या दोघांना आधी एक मुलगाही आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. एरॉल मस्क हे 76 वर्षांचे असून, ते दक्षिण आफ्रिकेतले अत्यंत श्रीमंत इंजिनीअर आहेत. त्यांचा सगळा वंशवृक्ष अर्थात Family Tree गुंतागुंतीची आहे. 'न्यूयॉर्क टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, एरॉल मस्क यांनी 1970 साली माये हाल्देमन या मॉडेलशी लग्न केलं. तिच्यापासून त्यांना एलॉन, किम्बल आणि टोस्का अशी तीन मुलं झाली. 1979 साली एरॉल आणि माये यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर एरॉल यांनी हेडी बेझुइडेनहाउट या विधवेशी लग्न केलं. एरॉल यांच्याशी लग्न करण्यापूर्वी हेडीला दोन मुलं होती. त्यापैकी जना ही मुलगी त्यांच्या लग्नाच्या वेळी 4 वर्षांची होती. एरॉल आणि हेडी यांना दोन मुलं झाली; मात्र एरॉल यांनी जनाच्या पालनपोषणालाही हातभार लावला. एरॉल आणि हेडी यांचं लग्न 18 वर्षं टिकलं. त्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. हेही वाचा - 'मैं बेवफा नही हूं...', तळहातावर लिहून महिला शिक्षिकेचं टोकाचं पाऊल त्यानंतर आश्चर्याची बाब म्हणजे 2017 साली जना बेझुइडेनहाउट या आपल्या सावत्र मुलीपासून एरॉल यांना एक मुलगा झाला. एलियट रश असं त्याचं नाव असून, त्याचं टोपण नाव रुशी असं आहे. जना ही एलॉन आणि त्यांच्या सख्ख्या भावंडांची सावत्र बहीण असली, तरी ती सगळी मुलं एकत्रच वाढली होती. त्यामुळे आपल्या सावत्र बहिणीला आपल्याच वडिलांपासून मूल झालं, ही बातमी ऐकल्यावर एलॉन आणि त्यांच्या भावंडांना विचित्रच वाटलं आणि मोठा धक्का बसला. त्यानंतर एरॉल आणि एलॉन या बापलेकांमध्ये भांडणही झालं. दरम्यान, 2019मध्ये एरॉल आणि जना यांना मुलगी झाली. 'द सन'ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत एरॉल यांनी ही गोष्ट उघड केली. 'अनप्लॅन्ड प्रेग्नन्सी'मुळे (Unplanned Pregnancy) या मुलीचा जन्म झाल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच, 'आपण पृथ्वीवर केवळ पुनरुत्पादनासाठीच आलो आहोत,' असं वक्तव्यही त्यांनी केलं. हेही वाचा - बालकृष्णासारखं नदीच्या पूरातून चिमुरड्याला वाचवलं; Video पाहून अंगावर काटा उभा राहील! 'रुशी 18 महिन्यांचा होईपर्यंत आम्ही एकत्रच होतो; आता मात्र आम्ही एकत्र राहत नाही,' असंही एरॉल यांनी स्पष्ट केलं. वयात असलेला 41 वर्षांचा फरक हे वेगळं होण्याचं कारण असल्याचं त्यांनी सांगितलं; मात्र एकमेकांवर अद्यापही प्रेम कायम असल्याचंही त्यांनी सांगितलं. आपल्या मुलांना आणि मुलींना ही गोष्ट आवडली नाही. कारण ती (जना) त्यांची सावत्र बहीण आहे, हेही एरॉल यांनी कबूल केलं. एलॉन मस्क यांनी रोलिंग स्टोनला दिलेल्या इंटरव्ह्यूत आपल्या वडिलांचं वर्णन 'ए टेरिबल ह्युमन बीइंग' असं केलं होतं. एरॉल यांच्या या ताज्या माहितीनंतर एलॉन यांनी अद्याप जाहीररीत्या काही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. 'मला शक्य झालं, तर आणखीही मुलांना जन्म देऊ शकतो. ते नाकारण्यासाठी मला कोणतंही कारण दिसत नाही,' असंही एरॉल यांनी सांगितलं. एरॉल यांना आतापर्यंत सात मुलं असून, त्यांचा मुलगा एलॉन यांनी आतापर्यंत 10 मुलांना जन्म दिला आहे. एलॉन यांना त्यांच्या कंपनीच्या एक्झिक्युटिव्हपासून दोन मुलं झाल्याची बातमी अलीकडेच आली होती. एकंदरीत मस्क कुटुंबीयांची फॅमिली ट्री भलतीच गुंतागुंतीची आहे.
First published:

Tags: Elon musk

पुढील बातम्या