काश्मीरच्या शोपियाँ आणि अनंतनागमधून 11 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला मोठं यश

दक्षिण काश्मीरमध्ये काल सकाळपासून मोठ्या प्रमाणावर दहशतवाद विरोधी कारवाया सुरू आहेत. त्यात 11 दहशतवाद्यांना ठार करण्यात लष्कराला मोठं यश आलं आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Apr 1, 2018 11:08 AM IST

काश्मीरच्या शोपियाँ आणि अनंतनागमधून 11 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला मोठं यश

01 एप्रिल : काश्मीरच्या शोपियाँ आणि अनंतनागमध्ये एकूण 11 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. दक्षिण काश्मीरमध्ये काल सकाळपासून मोठ्या प्रमाणावर दहशतवाद विरोधी कारवाया सुरू आहेत. त्यात 11 दहशतवाद्यांना ठार करण्यात लष्कराला मोठं यश आलं आहे.

शोपियान जिल्ह्यातल्या द्रग्गड गावात 7 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं, तर अनंतनागच्या दियालगाममध्ये एकाला ठार करण्यात आलं आहे. एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यातही लष्कराला यश आलं आहे. त्याचबरोबर सुरक्षा दलांनी अतिरेकींकडून मोठ्या प्रमाणावर दारुगोळा आणि हत्यारं जप्त केली आहेत.

राज्याचे डीजीपी एसपी वैद्य यांनी सांगितले की, ठार झालेल्या अतिरेकींमध्ये दोन प्रमुख कमांडरही मारले गेले आहेत. याशिवाय, शोपियांमध्ये कचदूरामध्ये सुरक्षा दलांमध्ये आणि दुकांनामध्ये लपलेल्या दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. त्यात काही स्थानिक नागरिकही अडकल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, श्रीनगर आणि बनिहालमधली रेल्वे सेवा स्थगित करण्यात आली आहे. तर दक्षिण श्रीनगरमध्ये इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 1, 2018 11:08 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close