ट्रॅक्टर आणि स्कॉर्पिओची भीषण धडक, 11 प्रवासी जागीच ठार

ट्रॅक्टर आणि स्कॉर्पिओची भीषण धडक, 11 प्रवासी जागीच ठार

पहाटे हा अपघात झाल्यामुळे ड्रायव्हरला डुलकी लागली होती अशीही शक्यता व्यक्त केली जातेय.

  • Share this:

मुजफ्फरपूर 07 मार्च : ट्रॅक्टर आणि स्कॉर्पियोच्या भीषण अपघातात तब्बल 11 प्रवासी जागीच ठार झाल्याची घटना घडलीय. या घटनेमुळे मुजफ्फरपूर जिल्हा हादरून गेलाय. भरधाव वेगाने येणारा ट्रॅक्टर आणि वेगात असलेली स्कॉर्पियो यांची ही टक्कर एवढी भीषण होती की स्कॉर्पियो उद्धवस्त झालीय. मुजफ्फरपूर इथल्या कांटी इथं हा अपघात झाला. अपघातात मृत्यूमुखी पडलेले सर्व नागरीक हे जवळच्या हाथौडी गावचे रहिवाशी आहेत. या अपघातात 7 जण जागीच ठार झालेत तर 4 जणांना उपारासाठी नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

घटनेनंतर अपघातस्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी येऊन घटनास्थळी पंचनामा केला असून ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरला ताब्यात घेतलं आहे. अपघात नेमका कशामुळे झाला याचा शोध पोलीस घेत आहेत. पहाटे हा अपघात झाल्यामुळे ड्रायव्हरला डुलकी लागली होती का? अशीही शक्यता व्यक्त केली जातेय.

अपघातात मृत्यूमुखी पडलेले सर्व हे एकाच कुटुंबातले आहेत अशी माहिती दिली जाते आहे. मात्र त्याला अधिकृत दुजोरा पोलिसांनी दिला नाही. या घटनास्थळावर या आधीही काही अपघात झाले आहेत. त्यामुळे इथे तातडीने उपयायोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरीकांनी केलीय.

हे वाचा..

उद्धव ठाकरे आज राम जन्मभूमीत, असा असेल अयोध्या दौरा!

कोरोनाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, N-95 मास्कसाठी लागणार डॉक्टरांची चिठ्ठी

'मुख्यमंत्रिपद हे उद्धव ठाकरेंचं काम नाही', चंद्रकांत पाटील यांची घणाघाती टीका

 

 

 

First published: March 7, 2020, 9:55 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading