शिक्षक की नराधम, शिकवणीच्या नावाखाली शाळेत 11 मुलींवर केला बलात्कार

26 वर्षीय शिक्षक शाळेत दारू पिऊन लहान लहान मुलींवर बलात्कार करीत होता

  • Share this:

हैद्राबाद, 8 मार्च : तेलंगणामधील एका खासगी शाळेतील 11 चिमुरड्यांसोबत बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपी शिक्षकाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्या चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या शिक्षकाने 11 शाळकरी मुलींवर बलात्कार केला आहे. हा शिक्षक शाळेच्या कॅम्पसमध्ये नेहमी दारू पित असल्याची बाब समोर आली आहे.

वानापार्थी पोलिसांनी याबाबत सांगितले की, शाळा बंद झाल्यानंतर 26 वर्षीय आरोपी काही विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र क्लासेस घेत होता. यादरम्यान तो कोणत्याही एका मुलीची निवड करायचा आणि दुसऱ्या खोलीत तिला घेऊन जात दृष्कृत्य करीत होता. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बलात्कार करण्यापूर्वी तो दारू पित असे. शाळेतील विद्यार्थिनी आणि त्याच्याकडे शिकवणी घेणाऱ्या विद्यार्थिनींना तो फसवत होता.

हे वाचा - हनीमूनआधी सासूने केली सूनेची कौमार्य चाचणी, नवरा म्हणाला 'लक्ष नको देऊ'

त्याने 11 मुलींवर बलात्कार केला होता. यापैकी दोन मुलींनी याबाबत आपल्या कुटुंबीयांना सांगितले. समाजाच्या भीतीमुळे तेदेखील पोलिसात तक्रार करण्यासाठी जात नव्हते. यानंतर गावातील ज्येष्ठ व्यक्तींनी तक्रार करण्यासाठी त्य़ांना आवाहन केलं. मात्र या दोन मुलींव्यतिरिक्त इतर 9 मुलींचे कुटुंबीय तक्रार दाखल करण्यासाठी पुढे येत नव्हते. पोलिसांच्या तपासात महत्त्वाचा खुलासा झाला आहे. हा आरोपी विद्यार्थिनींना परीक्षेदरम्यान मदत करणे, पेपर फोडणे आणि गुरुकूलमध्ये प्रवेश देण्याचं प्रलोभनं देत होता. वानापार्थीचे डीसीपी किरण कुमार यांनी सांगितले की, मुलींना खोटी आश्वासनं देत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता. जर मुलींनी याबाबत कोणालाही सांगितले तर परीक्षेत मदत करणार नसल्याची धमकी देत होता. आरोपी तेथे त्याच्या चुलत्यांसोबत राहत होता. बलात्काराची काही प्रकरणं त्याच्या घरातही झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणात आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 8, 2020 03:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading