मराठी बातम्या /बातम्या /देश /धार्मिक विधी करण्यासाठी 'या' मंदिरात जिवंत हत्तीऐवजी सुरू झाला यांत्रिक हत्तीचा वापर

धार्मिक विधी करण्यासाठी 'या' मंदिरात जिवंत हत्तीऐवजी सुरू झाला यांत्रिक हत्तीचा वापर

हत्ती

हत्ती

हिंदू धर्मामध्ये हत्तीला फार महत्त्व आहे. अनेक ठिकाणी विशेषत: दक्षिण भारतामध्ये हत्तींची पूजा केली जाते. काही मंदिरामध्ये तर हत्तीकडून मंदिरातील धार्मिक कार्यं करून घेतली जातात.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    नवी दिल्ली, 28 मार्च : हिंदू धर्मामध्ये हत्तीला फार महत्त्व आहे. अनेक ठिकाणी विशेषत: दक्षिण भारतामध्ये हत्तींची पूजा केली जाते. काही मंदिरामध्ये तर हत्तीकडून मंदिरातील धार्मिक कार्यं करून घेतली जातात. त्यासाठी खरेखुरे हत्ती पाळले जातात. मात्र, ही बाब हत्ती आणि दर्शनासाठी येणारे भाविक दोन्हींसाठी कधीकधी घातक ठरू शकते. मंदिर परिसरातील हत्ती अचानक बिथरून अपघात झाल्याच्या अनेक घटना या पूर्वी घडलेल्या आहेत. अशा परिस्थितीवर उपाय म्हणून केरळमधील एका मंदिरात यांत्रिक हत्ती बसवण्यात आला आहे. केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील इरिन्जादप्पिल्ली श्री कृष्ण मंदिरात धार्मिक विधी करण्यासाठी यांत्रिक हत्तीचा वापर केला जात आहे. पेटा इंडियानं अभिनेत्री पार्वती थिरुवोथूच्या सहकार्याने मंदिराला हा हत्ती भेट दिला आहे. 'इंडिया टुडे'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    श्री कृष्ण मंदिरातील यांत्रिक हत्तीचं नावदेखील ठेवण्यात आलं आहे. 'इरिन्जादापिल्ली रामन' असं या हत्तीला नाव देण्यात आलं आहे. एकदम खऱ्याखुऱ्या हत्तीसारखा दिसणारा हा यांत्रिक हत्ती साडे दहा फूट उंचीचा आहे. तर, त्याचं वजन 800 किलो आहे. हा हत्ती चार व्यक्ती पाठीवर घेऊन जाऊ शकतो. हत्तीचं डोकं, डोळे, तोंड, कान आणि शेपूट हे सर्व अवयव विजेवर काम करतात.

    हेही वाचा -   महाराष्ट्रातील एकमेव गाव जिथे चोरी होत नाही? बँकांनाही कुलूप नाही

    रविवारी (26 फेब्रुवारी) इरिन्जादप्पिल्ली रामनचा 'नादायरुथल' (देवांना हत्ती अर्पण करण्याचा सोहळा) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विधी, उत्सव किंवा इतर कोणत्याही उद्देशासाठी हत्ती किंवा इतर प्राणी ठेवू नका किंवा भाड्याने घेऊ नका, असं या मंदिर समितीनं आवाहन केलं होतं. या निर्णयाचं कौतुक म्हणून पेटा इंडियानं मंदिराला रोबोटिक हत्ती भेट दिला आहे.

    पेटा इंडियानं एका निवेदनात म्हटलं आहे, "बंदिस्त परिस्थितीमुळे निर्माण झालेली निराशा हत्तींमध्ये असामान्य वर्तन विकसित करण्यास आणि ते दाखवण्यास प्रवृत्त करते. सहनशीलतेचा कळस झाल्यानंतर अनेकदा हत्ती अनियंत्रित होतात आणि मोकळं होण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मनुष्य, इतर प्राणी आणि मालमत्तेचे नुकसान होतं. हेरिटेज अॅनिमल टास्क फोर्सनं संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, केरळमध्ये 15 वर्षांच्या कालावधीत बंदिस्त हत्तींनी 526 लोकांचा बळी घेतला आहे. चिक्कट्टुकावू रामचंद्रन नावाच्या हत्तीला सुमारे 40 वर्षे बंदिवासात ठेवण्यात आलं आहे. केरळमधील सण-उत्सवांमध्ये सर्वांत जास्त वापरल्या जाणार्‍या हत्तींमध्ये त्याचा समावेश होतो. त्यानं आत्तापर्यंत 13 जणांना ठार मारलं आहे. ज्यामध्ये सहा माहूत, चार महिला आणि तीन इतर हत्तींचा समावेश आहे".

    सर्व धार्मिक ठिकाणं आणि कार्यक्रमांमध्ये वास्तविक हत्तींच्या जागी यांत्रिक हत्ती किंवा इतर साधनांचा वापर करण्याची विनंती पेटानं आपल्या निवेदनात केली आहे.

    केरळमधील मंदिरातील उत्सव हत्तींशिवाय अपूर्ण मानले जातात. पण, इतर मंदिरं देखील धार्मिक विधी करण्यासाठी जिवंत हत्तींच्या जागी यांत्रिक हत्ती वापरतील, अशी इरिन्जादाप्पिल्ली श्री कृष्ण मंदिर समितीतील अधिकाऱ्यांना आशा आहे.

    First published:
    top videos

      Tags: Kerala, Viral