भारतात दररोज एक व्यक्ती हत्ती आणि वाघाकडून मारली जाते !

भारतात दररोज एक व्यक्ती हत्ती आणि वाघाकडून मारली जाते !

हत्ती आणि वाघाच्या हल्ल्यात भारतात दररोज एक व्यक्ती मारली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. देशभरात गेल्या 1,143 दिवसांमध्ये अशा प्रकारचे तब्बल 1,144 हल्ले झालेत.

  • Share this:

नवी दिल्ली, (एएफपी) : हत्ती आणि वाघाच्या हल्ल्यात भारतात दररोज एक व्यक्ती मारली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. देशभरात गेल्या 1,143 दिवसांमध्ये अशा प्रकारचे तब्बल 1,144 हल्ले झालेत. त्यामधले 1,052 हल्ले हे हत्तींकडून तर वाघांनी केलेल्या हल्ल्यांची संख्या 92 आहे. विशेषतः प. बंगालमध्ये अशा हल्ल्यांचं प्रमाण सर्वाधिक म्हणजेच 25 टक्क्यांच्या आसपास आहे.

या भयावह आकडेवारीकडे आपल्याला वाटेल की फक्त वाघ आणि हत्तींनीच मनुष्य प्राण्यावर सर्वाधिक हल्ले केलेत. पण वस्तूस्थिती तशी नाहीये. याच काळात देशभरात तब्बल 345 वाघ मारले गेलेत तर 84 हत्तींचा मानवी हल्ल्यादरम्यान मृत्यू झालाय. थोडक्यात काय तर तेवढ्याच क्रूर पद्धतीने वाघ-हत्ती मारले जातात, पण लक्षात घेतं कोण ? अशीच काहिशी परिस्थिती आहे.

राज्यसभेतील एका चर्चेदरम्यान केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीच ही हत्ती-वाघांच्या हल्ल्यांबाबतची ही आकडेवारी दिलीय.

जंगली जनावर आणि मानवी संघर्षांत प्रती दिवसाला दोन व्यक्तींचा मृत्यू होत असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झालंय. शिवसेनेचे खासदार वेणुगोपाल धूत यांनी यासंबंधीचा प्रश्न विचारला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 2, 2017 07:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading