VIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण

VIDEO : हत्तींचा कळप शेतात घुसला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण

शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान तर होतंच आहे, शिवाय कित्येक व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे.

  • Share this:

कारवार, 18 नोव्हेंबर : जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी हत्तीच्या कळपाचे उपद्रव वाढले आहेत. हत्तींचा कळप शेतात घुसून पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याचबरोबर या हत्तींच्या उपद्रवामुळे ग्रामस्थही भीतीच्या छायेत आहेत.

आतापर्यंत कुठे-कुठे नुकसान झालं?

पाच हत्तींच्या कळपाने मुंदगोड़ येथे शेतात धुडगूस घालत पिकांचं नुकसान केल. तर बेळगावजवळील गूंजी गावात कापणी करून मळणी करण्यासाठी ठेवलेले भातपीक वळीचीही नासधूस केली आहे.

मूंदगोड़ तालुक्यातील एका गावात जंगली हत्तींच्या कळपाने सुपारी व केळी बागेत घुसून 400 पेक्षा अधिक केळी व 100 सुपारीच्या झाडांचे नुकसान केलं. संबांधित क्षेत्राचे वनक्षेत्राधिकारी सुरेश कुल्लोळी यांनी माहिती देताना सांगितले की, या कळपात पाच हत्तींच्या समावेश आहे. दोन पिलांसह दोन मादी हत्तिणी आहेत.

हत्तींचा हा कळप जवळपासच्या जंगल प्रदेशात थांबल्याची शक्यता आहे. त्यामुळे हा कळप पुन्हा एकदा गावातील शेतात परतण्याची शक्यता आहे. त्यामुळे वनखात्याच्या कर्मचार्‍यांना कळपाच्या हालचालींवर नजर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

अलिकडच्या काळात या भागामध्ये वाघ, बिबट्या, गविरेडे, हत्ती, अजगर, किंग कोब्रा, अस्वल आदींसह अनेक प्रकारचे वन्यप्राणी अन्नाच्या शोधात नागरी वस्तीमध्ये येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान तर होतंच आहे, शिवाय कित्येक व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 19, 2018 12:38 PM IST

ताज्या बातम्या