वारंवार जात होती वीज, शेवटी तपास करण्यासाठी ऊर्जा मंत्रीच चढले खांबावर आणि...

वारंवार जात होती वीज, शेवटी तपास करण्यासाठी ऊर्जा मंत्रीच चढले खांबावर आणि...

वारंवार वीज जात असल्याच्या तक्रारीमुळे ऊर्जा मंत्री वैतागले आणि शेवटी त्यांनीच पाऊल उचललं.

  • Share this:

भोपाळ, 19 जून : मध्य प्रदेशात शुक्रवारी ऊर्जा मंत्री प्रद्युम्न तोमर यांचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. ग्वाल्हेरमध्ये वारंवार लोड शेडिंग आणि वीज नसल्याच्या तक्रारीवर ऊर्जा मंत्र्यांनी स्वत: जाऊन तपास केला. यासाठी ते स्वत: विजेच्या खांब्यावर चढले. शिड्यांच्या मदतीने ऊर्जामंत्री खाब्यांवर चढले आणि ते व्यवस्थित करू लागले. तेथे जमा झालेला कचरा हटवला व साफ-सफाईदेखील केली. ट्रान्सफॉर्मवर झाड आणि सुकी पानं जमा झाल्यामुळे वीज सप्लायमध्ये अडथळा होत होता आणि वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे सर्वसामान्यांची माफी मागितली.

यावर ऊर्जा मंत्री म्हणाले की, जेथेही ट्रिपिंग होईल तेथे जाऊन निरीक्षण करण्यात येईल आणि आवश्यकता पडल्यास आवश्यक बदल केले जातील. त्यांनी पीएस आणि एमडीला नागरिकांना योग्य प्रकारे वीज पोहोचविण्याचे निर्देशदेखील दिली आहेत. ऊर्जा मंत्री तोमर ग्वाल्हेर येथील राहणारे आहेत. ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं की, प्रमुख सचिव, वीज कंपनीच्या तीनही एमडींनादेखील सक्त ताकीद देण्यात आली आहे. जर प्रदेशात ट्रिपिंगची समस्या असेल तर स्वत: ठीक करीन आणि अधिकाऱ्यांनाही ठीक करावयास सांगेन.

हे ही वाचा-एकाच वर्षात दोनवेळा दिवाळी-दसरा; या कंपनीतील कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा पगारवाढ

ऊर्जा मंत्री तोमर सध्या अक्शनमोडमध्ये पाहायला मिळत आहेत. ग्वाल्हेरमध्ये त्यांनी काही दिवसांपूर्वी अचानक एक सब स्टेशनवर छापा मारला होता. येथून दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या होत्या. यानंतर वीज विभागाच्या अधिकाऱ्यांची कानउघडणीही केली होती.

Published by: Meenal Gangurde
First published: June 19, 2021, 3:41 PM IST

ताज्या बातम्या