मराठी बातम्या /बातम्या /देश /

यंदाची दिवाळी अंधारात जाणार? देशात वीजेचं महासंकट, 135 पैकी 110 प्लांट्समध्ये कोळशाचा तुटवडा

यंदाची दिवाळी अंधारात जाणार? देशात वीजेचं महासंकट, 135 पैकी 110 प्लांट्समध्ये कोळशाचा तुटवडा

7 ऑक्टोबर रोजी केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या अहवालानुसार, देशातील 135 पैकी 110 प्लांट कोळशाच्या संकटाला तोंड देत आहेत आणि गंभीर स्थितीत पोहोचले आहेत

7 ऑक्टोबर रोजी केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या अहवालानुसार, देशातील 135 पैकी 110 प्लांट कोळशाच्या संकटाला तोंड देत आहेत आणि गंभीर स्थितीत पोहोचले आहेत

7 ऑक्टोबर रोजी केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या अहवालानुसार, देशातील 135 पैकी 110 प्लांट कोळशाच्या संकटाला तोंड देत आहेत आणि गंभीर स्थितीत पोहोचले आहेत

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 12 ऑक्टोबर : देशातील अनेक वीज कंपन्यांसमोर कोळशाच्या तुटवड्याचे (Shortage of Coal in Power Plant) संकट निर्माण झाले आहे (Electricity Crisis in India). यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये वीज संकटाची परिस्थिती असल्याचं बोललं जात आहे. या मुद्द्यावर काही राज्यांची सरकारं आणि केंद्र सरकारच्या दाव्यांमध्ये मोठा फरक आहे. प्रश्न असा आहे की दिवाळीचा सण पुढील महिन्याच्या सुरुवातीला येत आहे. अशा स्थितीत यावर्षी दिवाळी अंधारात जाणार नाही ना? याची चिंता नागरिकांना आहे.

वीज संकटाचा धोका केवळ भारतातच नाही तर चीन, युरोप आणि अमेरिकेतही आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, दरवर्षी ऑक्टोबरपासून विजेची मागणी वाढू लागते. दिल्ली, पंजाब, केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक सरकारने बिघडलेल्या परिस्थितीवर केंद्राला इशारा दिला आहे. एवढंच नव्हे, तर केरळ, महाराष्ट्राने नागरिकांना काळजीपूर्वक विजेचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे भारत वीज संकटाकडे वाटचाल करत आहे का? चीनप्रमाणेच देशातील अनेक भागात अंधार पसरू शकतो का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

उद्या देशाला मिळणार गिफ्ट; लाँच होणार 100 लाख कोटींची पंतप्रधान गतिशक्ती योजना

7 ऑक्टोबर रोजी केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या अहवालानुसार, देशातील 135 पैकी 110 प्लांट कोळशाच्या संकटाला तोंड देत आहेत आणि गंभीर स्थितीत पोहोचले आहेत. 16 प्लांटमध्ये एका दिवसासाठीचाही कोळसा साठा नाही. 30 प्लांट्सकडे फक्त 1 दिवसाचा कोळसा साठा शिल्लक आहे. यासोबतच 18 प्लांट्समध्ये फक्त 2 दिवसांचा साठा शिल्लक आहे. म्हणजेच परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. यामध्ये, हरियाणा आणि महाराष्ट्रातील 3 प्लांट आहेत, जिथे साठ्यात एका दिवसासाठीचाही कोळसा नाही.

पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, बिहारमध्ये प्रत्येकी एक प्लांट आहे, जिथे केवळ एक दिवसाचा साठा शिल्लक आहे. , पश्चिम बंगालच्या 2 प्लांटमध्येही अशीच परिस्थिती आहे. केरळ आणि महाराष्ट्राने नागरिकांना सावधगिरीने वीज वापरण्याचं आवाहन केलं आहे.

NDA Recruitment 2021: महिलांच्या NDA प्रवेशासाठी काय असतील शारीरिक फिटनेस निकष?

देशातील वीज निर्मिती उद्योग मोठ्या प्रमाणावर कोळशावर अवलंबून आहे. 388 GW ची एकूण वीज निर्मिती क्षमता असलेले प्लांट आहेत. ज्यामध्ये 54% म्हणजे 208.8 GW वीज कोळशावर आधारित प्लांटमधून निर्माण होते. गेल्या वर्षी देशात कोळशापासून 1,125.2 टेरावॅट-तास वीज तयार झाली होती. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात विजेची मागणी वाढते, पण यावर्षी गोष्ट वेगळी आहे. गेल्या दोन महिन्यांत देशाची अर्थव्यवस्था जवळजवळ पूर्णपणे खुली झाली आहे, जी गेल्या 18 महिन्यांपासून कोविडच्या निर्बंधांमुळे ठप्प झाली होती. ऑगस्ट-सप्टेंबर या दोन महिन्यांत विजेचा वापर दरमहा 124.2 अब्ज युनिटपर्यंत पोहोचला, जो 2019 च्या या दोन महिन्यांत 106.6 अब्ज युनिट प्रति महिना होता.

First published:

Tags: Electricity, Electricity cut