S M L

तोल गेल्याने शशी थरूर पडले, डोक्याला गंभीर जखम

डॉक्टरांनी शशी थरूर यांची तब्येत ठिक असल्याचे सांगितले असून कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Updated On: Apr 15, 2019 01:28 PM IST

तोल गेल्याने शशी थरूर पडले, डोक्याला गंभीर जखम

तिरुअनंतपुरम, 15 एप्रिल : काँग्रेस खासदार आणि तिरुवअनंतपूरम लोकसभा मतदार संघातील उमेदवार शशी थरूर मंदिरात पूजा करताना जखमी झाले. सोमवारी थम्प नूर येथील गांधारी अम्मन कोविल इथं तोल गेल्याने थरूर यांच्या डोक्याला मार लागला असून पायही दुखावला आहे. प्राथमिक उपचारानंतर त्यांना सुपर स्पेशालिटी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या डोक्याला आठ टाके पडले आहेत.
शशी थरूर यांच्या डोक्यावर लोखंडाची सळी पडल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. सळी लागल्याने त्यांना खोल जखम झाली आणि टाके घालण्यात आले असं म्हटलं आहे. रूग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची तब्येत ठिक असून कोणताही धोका नसल्याचे म्हटले आहे. गरज पडल्यास इतर वैद्यकिय तपासण्या केल्या जातील असे डॉक्टरांनी सांगितले आहे.Loading...

कजक्कोट्टम येथे निवडणूक प्रचार करताना 11 एप्रिलला त्यांची तुला करण्यात आली होती. हा एक मोठा कार्यक्रम असतो. याबद्दल त्यांनी ट्विटरवरून माहिती दिली होती. तुला करून त्या व्यक्तिच्या वजनाइतके साहित्य दान दिले जाते.

VIDEO : 'पुन्हा असं बोलायचं नाही', जाहीर सभेतच शरद पवारांनी दिली अमरसिंह पंडितांना वॉर्निंग


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 15, 2019 01:23 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close