डोंगराळ भागातला हवाई प्रवास आणि ८ तासांची पायपीट, एक खडतर मतदानयात्रा

डोंगराळ भागातला हवाई प्रवास आणि ८ तासांची पायपीट, एक खडतर मतदानयात्रा

लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे. अरुणाचल प्रदेश, लडाख अशा दुर्गम सीमाभागात ही तयारी तर हायटेक झाली आहे. भारत - म्यानमार सीमेवरच्या भागात विजयनगर सर्कलमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांना हेलिकॉप्टरने नेण्यात आलं.

  • Share this:

गुवाहाटी, 8 एप्रिल : लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे. अरुणाचल प्रदेश, लडाख अशा दुर्गम सीमाभागात ही तयारी तर हायटेक झाली आहे. भारत - म्यानमार सीमेवरच्या भागात विजयनगर सर्कलमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांना हेलिकॉप्टरने नेण्यात आलं.

निवडणूक अधिकाऱ्यांच्या 4 तुकड्या भारतीय हवाई दलाच्या विमानाने सीमेवर रवाना झाल्या. त्यांच्यासोबत मतदानाची सगळी यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रं हा जामानिमा हेलिकॉप्टरने पोहोचवण्यात आला. भारत - म्यानमार सीमेवर छांगलांग जिल्ह्यात 4 मतदान केंद्रांवर 3 हजार मतदार आहेत.

अरुणाचल प्रदेशमध्ये 11 एप्रिलला लोकसभा आणि विधानसभा दोन्हीसाठी मतदान होणार आहे.

अरुणाचल प्रदेशमधला विजयनगर हा भाग तिन्ही बाजूंनी म्यानमारने वेढलेला आहे. सीमेवरच्या या भागात घनदाट जंगल आहे. हे नामडफा नॅशनल पार्क नावाचं अभयारण्य आहे.

या दुर्गम भागात जाण्यासाठी रस्ते नाहीत. विजयनगरला एअरपोर्ट आहे पण इथली विमान वाहतूक पूर्णपणे बंद आहे. इथून मियाव हे छोटंसं शहर 150 किलोमीटर आहे.

विजयनगरला जाण्यासाठी 25 मिनिटांचा हेलिकॉप्टर प्रवास आणि त्यानंतर 8 तास डोंगराळ भागातून पायपीट करावी लागते. त्यामुळे सगळ्यात राजकीय पक्षांना इथल्या मतदारांपर्यंत पोहोचणं खूपच कठीण जातं. निवडणूक अधिकाऱ्यांना तर तिथे जाऊनच मतदान केंद्रं उभारावी लागतात.

विजयनगरच्या आसपास 16 खेडी आहेत. इथे लिशु जमातीचे मतदार राहतात. तसंच आसाम रायफल्स पर्सनलचे निवृत्त अधिकारीही राहतात. त्यांच्यासाठी ही मतदान यंत्रणा एवढ्या दुर्गम भागात न्यावी लागली आहे.

अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्रच होत असल्याने निवडणूक यंत्रणांना एकदाच कामगिरी करावी लागणार आहे. आता या सगळ्या प्रयत्नांना मतदारांनीही प्रतिसाद देणं गरजेचं आहे.

==============================================================================================================================================================

SPECIAL REPORT : भाजपचं 'संकल्प पत्र' मतदारांना प्रभावित करेल का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2019 10:09 PM IST

ताज्या बातम्या