के.पद्मराजन यांची 201वी निवडणूक राहुल गांधींच्या विरोधात

के.पद्मराजन यांची 201वी निवडणूक राहुल गांधींच्या विरोधात

के.पद्मराजन राहुल गांधींच्या विरोधात वायनाड येथून उभे राहणार आहेत.

  • Share this:

सेलम, 05 एप्रिल: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीचा अर्ज दाखल केला. या मतदारसंघात त्यांची लढत माकपच्या उमेदवाराशी होणार आहे. पण याशिवाय त्यांना आणखी एका उमेदवाराविरुद्ध लढावे लागणार आहे. अर्थात हा उमेदवार कोणत्याही पक्षाचा नाही तर तो अपक्ष आहे. इतक नव्हे तर ही त्याची 201वी निवडणूक आहे. वाचून तुम्हाला देखील अश्चर्य वाटेल पण इलेक्शन किंग म्हणून अशी ओळख असलेले के.पद्मराजन राहुल गांधींच्या विरोधात वायनाड येथून उभे राहणार आहेत.

वाचा संबंधित बातमी: भारतीय निवडणुकांच्या इतिहासात या उमेदवाराच्या नावावर आहे अनोखा विक्रम

डॉ.पद्मराजन यांना छंद असल्यासारखे ते निवडणुकीला उभे राहतात आणि सपाटून आपटतात. पुन्हा पुढच्या निवडणुकीची घोषणा झाली की कंबर कसून या लोकशाहीच्या यज्ञात उभे राहतात. त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली 1988 पासून. त्यांनी अनेक दिग्गजांविरोधात उभं राहून अपयश पत्करलं आहे. आतापर्यंत 170 निवडणुका ते लढले आणि त्यातली एकही जिंकलेली नाही.

तामिळनाडूत सालेम जिल्ह्यातले रहिवासी असलेले पद्मनाभन होमिओपॅथी डॉक्टर म्हणून कार्यरत होते. नंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. 1988 पासून ते निवडणुकांना उभे राहात आहेत. यांनी तिथल्या अनेक स्थानिक निवडणुका तर लढल्या आहेतच. पण ते केवळ स्थानिक निवडणूक लढवणारे उमेदवार नाहीत. त्यांनी अनेक राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांना शह देण्याच्या इच्छेने उमेदवारी दाखल केली होती. इतकंच काय अगदी पंतप्रधानपदी नाव घेतलं जातंय अशा उमेदवाराविरोधातही पद्मराजन उभे राहिल्याचा इतिहास आहे.

या बड्या नेत्यांविरोधात लढले आणि हरले

अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग, प्रणब मुखर्जी, ए पी जे अब्दुल कलाम, जयललिता, एम. करुणानिधी या बड्या नेत्यांविरोधात पद्मराजन यांनी लढत दिली आहे. अर्थातच या नेत्यांपुढे त्यांचा टिकाव लागलेला नाही. ऑल इंडिया इलेक्शन किंग असं ते स्वतःला म्हणवून घेतात.

पद्मराजन यांनी आतापर्यंत 28 लोकसभा निवडणुका लढवल्या आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रपती पदाची निवडणूकही ते लढले आहेत. एकदा नव्हे तर 8 वेळा. 11 मुख्यमंत्र्यांविरोधात त्यांनी निवडणुका लढवल्या आणि हरले.

VIDEO : राहुल गांधींच्या समोर भुजबळांनी केली मोदींची मिमिक्री

<iframe class="video-iframe-bg-color iframe-onload" onload="resizeIframe(this)" id="story-358777" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/MzU4Nzc3/"></iframe>

First published: April 5, 2019, 9:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading