राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर ; राजकीय पक्षांना व्हीप काढण्यास मनाई

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. राष्ट्रपतीपदासाठी 17 जुलैला मतदान होणार आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 7, 2017 05:52 PM IST

राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर ; राजकीय पक्षांना व्हीप काढण्यास मनाई

07 जून : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. राष्ट्रपतीपदासाठी 17 जुलैला मतदान होणार आहे. तर तीन दिवसांनंतर म्हणजेच 20 जुलैला मतमोजणी होणार आहे अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी केलीये.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा जुलै महिन्यात कार्यकाळ संपणार आहे. त्यांचा कार्यकाळ संपण्याआधी निवडणूक होणार आहे. राष्ट्रपतीपदासाठी 14 जून रोजी अधिसुचना निघणार आहे.

त्यानंतर राष्ट्रपतीपदासाठी 28 जूनपर्यंत इच्छूक उमेदवार अर्ज करू शकतात. 29 जूनला अर्जांची छानणी होणार आणि 1 जुलैपर्यंत अर्ज मागे घेणार आहे. त्यानंतर 20 जुलैला मतदान आणि 23 जुलैला मतमोजणी होणार असल्याचं झैदी यांनी स्पष्ट केलं.

या निवडणुकीसाठी खासदार आपल्या इच्छेनुसार मतदान करू शकतात. राजकीय पक्षांना व्हीप काढता येणार नाही असं झैदी यांनी स्पष्ट केलं.

  राष्ट्रपतीपदासाठी असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम

Loading...

मतदान

- १७ जूलै २०१७

मतमोजणी

- २० जूलै २०१७

अधिसुचना १४ जून २०१७ रोजी जारी होणार

अर्ज करण्याची अंतिम तारीख - २८ जून

अर्ज छानणी - २९ जून

अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख

- १ जूलै २०१७

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2017 05:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...