राष्ट्रपतीपदासाठी मतदान सुरू, पंतप्रधान आणि अमित शहांनी केलं मतदान

राष्ट्रपतीपदासाठी मतदान सुरू, पंतप्रधान आणि अमित शहांनी केलं मतदान

भारताचे चौदावे राष्ट्रपती कोण होणार, हे ठरवणारी ही निवडणूक आहे.

  • Share this:

17 जुलै : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू झालंय. भारताचे चौदावे राष्ट्रपती कोण होणार, हे ठरवणारी ही निवडणूक आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद विरुद्ध संयुक्त पुरोगामी आघाडीच्या मीरा कुमार यांच्यात राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे.

भाजपाच्या नेतृत्वातील रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचे पारडे जड मानले जात आहे. विरोधकांच्या उमेदवार मीरा कुमार यांच्याकडून प्रादेशिक पक्षांचे समर्थन मिळविण्याचा प्रयत्न अखेरपर्यंत सुरू आहे.

रामनाथ कोविंद यांच्या बाजूने भाजपा, शिवसेना, पीडीपी, टीआरएस, अण्णाद्रमुक, वायएसआर काँग्रेस, बिजू जनता दल, जनता दल युनायटेड, तेलगु देसम पार्टी, लोकजनशक्ती पार्टी, शिरोमणी अकाली दल, एजीपी, एनपीपी, अपना दल हे आहेत.

मीरा कुमार यांच्या बाजूने काँग्रेस, तृणमूल, माकपा, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पार्टी, बसपा, भाकपा, जनता दल सेक्युलर, जेएमएम, डीएमके, एआययूडीएफ हे पक्ष आहेत.

दिल्लीबरोबर मुंबईतही राष्ट्रपती निवडणूक मतदान सुरू झालंय. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होईल. 20 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

 

 

First Published: Jul 17, 2017 10:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading