निवडणूक आयोगाला सापडलं घबाड, 1 हजार 381 किलो सोनं जप्त!

निवडणूक आयोगाला सापडलं घबाड, 1 हजार 381 किलो सोनं जप्त!

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निवडणूक आयोगाने आजवरची सर्वात मोठी कारवाई केली आहे.

  • Share this:

चेन्नई, 17 एप्रिल: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निवडणूक आयोगाने आजवरची सर्वात मोठी कारवाई केली आहे. तामिळनाडूमधील चेन्नईजवळच्या एका चेकपोस्टवर तब्बल 1 हजार 381 किलो सोनं जप्त करण्यात आले आहे. आतापर्यंत हे समजू शकले नाही की इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं कोठे पाठवण्यात येत होते. चेन्नईला रिटेल गोल्ट कॅपिटल असे म्हटले जाते. त्यामुळे हे सोनं एखाद्या व्यापाऱ्याचे देखील असू शकते, अशी शक्यता आहे. या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत.

निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने बुधवारी ही धडक कारवाई केली. चेन्नई जवळच्या अवादी चेकपोस्टवर एका गाडीतून 1 हजार 381 किलो सोनं जप्त करण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं कोठे पाठवण्यात येत होते याचा तपास सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर आयोगाने देशातील अनेक ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त केली होती. निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर केला जातो. यासाठी आयोगाकडून देखील कारवाई केली जाते. बुधवारी आयोगाने टीटीव्ही दिनकरन यांच्या अम्मा मक्कल मुनेत्र कळघम पक्षाच्या कार्यालयावर छापा टाकला होता. या छाप्यात कार्यालयातून एका कार्यकर्त्याकडून 1 कोटी 48 लाख रुपये जप्त करण्यात आले होते.

ही कारवाई अंडीपट्टी जिल्ह्यात करण्यात आली होती. दोन दिवसात येथे विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. छापे टाकले तेव्हा निवडणू्क अधिकारी आणि एएमएमच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता.

SPECIAL REPORT : विकासाचा अजेंडा आता जातीवर घसरला का?

First published: April 17, 2019, 9:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading