नरेंद्र मोदी – अमित शहांना क्लिन चीट देण्यास ECच्या या अधिकाऱ्याचा होता विरोध

नरेंद्र मोदी – अमित शहांना क्लिन चीट देण्यास ECच्या या अधिकाऱ्याचा होता विरोध

नरेंद्र मोदी यांना क्लिन चीट देण्यास समितीतील एका सदस्यानं विरोध केला होता.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 मे : प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी भारतीय सेना आणि एअर स्ट्राईकचा उल्लेख केला. त्यानंतर नरेंद्र मोदी आणि अमित शहांविरोधात निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार देखील दाखल करण्यात आली. यावर निकाल देताना निवडणूक आयोगानं मोदी – शहा यांना क्लिनचीट दिली. पण, आता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना क्लिन चीट देण्यास निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी विरोध केला होता अशी माहिती आता समोर येत आहे. इंडियन एक्सप्रेसनं याबाबतची माहिती दिली आहे.

‘लग्न करायचं असल्यास हिंदू धर्म स्वीकार, मासांहार सोडून दे’

काय होतं रिपोर्टमध्ये

इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना प्रचारादरम्यान सैन्याच्या नावाचा वापर केल्यासह इतर पाच प्रकरणात क्लिन चीट देण्यास विरोध केला होता. पाटणा येथे बोलताना नरेंद्र मोदी विंग कमांडर अभिनंदन सुखरूप भारतात आले नसते तर पाकिस्तानला धडा शिकवला गेला असता असं विधान केलं होतं. याबाबत तीन सदस्यीय कमिटीमध्ये अशोक लवासा यांच्यासह मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा आणि निवडणूक आयुक्त सुशील चंद्र देखील सहभागी होते.

रिपोर्टमधील माहितीनुसार अशोक लवासा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वर्ध्यातील 1 एप्रिलचं भाषण, नांदेडमधील 6 एप्रिलचं भाषण, 9 एप्रिल रोजीचं लातूर आणि चित्रदुर्ग येथील भाषणांमध्ये देखील क्लिन चीट देण्यास विरोध केला होता.

शिवाय, अमित शहा यांच्या नागपूर येथील 9 एप्रिलच्या भाषणाला आणि वायनाडमधील भाषणामध्ये देखील क्लिन चीट देण्यास अशोक लवासा यांनी विरोध केला होता. पण, समितीतील अन्य सदस्यांनी मात्र क्लिन चीट देण्याचं समर्थन केलं होतं. अद्याप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चित्रदुर्ग येथील भाषणाबाबत क्लिन चीट देण्यावर काहीही निर्णय झालेला नाही.

VIDEO: 15 गावांमधील श्रमदानात अजित पवार कुटुंबियासोबत सहभागी

First published: May 5, 2019, 2:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading