Home /News /national /

'प्रचार करा मात्र सांभाळून, अन्यथा...', निवडणूक आयोगानं नेत्यांना दिला इशारा

'प्रचार करा मात्र सांभाळून, अन्यथा...', निवडणूक आयोगानं नेत्यांना दिला इशारा

स्टार प्रचारक आणि नेत्यांनी विना मास्क प्रचार केल्याच्या घटनांचा उल्लेख करत निवडणूक आयोगानं (Election Commission of India) मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या निर्देशांचं (COVID-19 Protocol) गांभीर्यानं पालक करण्याचं आवाहन केलं आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली 10 एप्रिल : कोरोना रुग्णांच्या संख्येत (Coronavirus In India) दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशात पाच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये निवडणुकीच्या (Assembly Election 2021) प्रचारासाठी अनेक प्रचारसभा घेण्यात येत आहेत. अशात प्रचारादरम्यान स्टार प्रचारक आणि नेत्यांनी विना मास्क प्रचार केल्याच्या घटनांचा उल्लेख करत निवडणूक आयोगानं (Election Commission of India) मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या निर्देशांचं (COVID-19 Protocol) गांभीर्यानं पालक करण्याचं आवाहन केलं आहे. निवडणूक आयोगानं सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना पत्र पाठवलं. या पत्रात म्हटलं, की या आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवली गेली आहे. आयोगाच्या असं लक्षात आलं आहे, की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येणाऱ्या बैठका आणि प्रचारादरम्यान आयोगाकडून जारी करण्यात आलेले निर्देश पायदळी तु़डवले जात आहेत. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर यासारख्या नियमांचंही पालन होत नसल्याचं आयोगानं म्हटलं आहे. PHOTOS: वीकेंड लॉकडाऊनमुळे मुंबईतील रस्ते सामसूम; जाणून घ्या काय आहे नियमावली मास्क वापरण्याच्या नियमाचं पालन नाही - पत्रात म्हटलं आहे, की स्टार प्रचारक, नेते किंवा उमेदरावारांसह निवडणुकीच्या प्रचारात मोठ्या संख्येत उपस्थित राहाणाऱ्या अनेकांना कोरोनाची लागण होण्याची भीती आहे. त्यामुळे निवडणूक आयोगानं थेट इशारा दिला, की निर्देशांचं पालन न करणाऱ्या उमेदवारांच्या, स्टार प्रचारकांच्या आणि नेत्यांच्या सभा आणि रॅलींवर बंदी घालण्याचं पाऊलही आयोग उचलू शकतं. शुक्रवारी 1,44,829 नवे रुग्ण - देशात शुक्रवारी कोरोनाचे 1,44,829 नवे रुग्ण आढळले आहेत. देशात आतापर्यंत 1,68,467 रुग्णांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. तर, 11,987,940 जण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या देशात 1,046,376 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनाचा वाढता प्रसार पाहाता अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन आणि मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. तर, महाराष्ट्रातही आजपासून सोमवारपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Assembly Election 2021, Election commission

    पुढील बातम्या